AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : Logan Paul ची WWE WrestleMania मध्ये धमाकेदार एन्ट्री, गळ्यात 45 कोटींचं पोकेमॉन कार्ड, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद

सोशल मीडिया स्टार लोगन पॉलने WWE WrestleMania मध्ये प्रवेश केला ही बाब अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारी होती. WWE WrestleMania या शोमध्ये प्रवेश करतानाची त्याची स्टाईलही भलतीच चर्चेत आहे. त्याच्या गळ्यात एक पोकेमॉन ट्रेड कार्ड दिसत आहे.

Video : Logan Paul ची WWE WrestleMania मध्ये धमाकेदार एन्ट्री, गळ्यात 45 कोटींचं पोकेमॉन कार्ड, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद
लोगन पॉल
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Apr 04, 2022 | 2:43 PM
Share

मुंबई : सोशल मीडिया स्टार लोगन पॉलने (Logan Paul) WWE WrestleMania मध्ये प्रवेश केला ही बाब अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारी होती. WWE WrestleMania या शोमध्ये प्रवेश करतानाची त्याची स्टाईलही भलतीच चर्चेत आहे. या शोमध्ये जाताना त्याने जगातील सर्वात महागडे पोकेमॉन कार्ड (Pokemon Card) गळ्यात घातलं होतं. त्याची किंमत 45 कोटींहून अधिक असल्याचं बोललं जातंय. हे अतिशय दुर्मिळ पिकाचु ग्राफिक कार्ड आहे. त्याचा हा अश्या लूकमधला एक व्हीडिओ WWE ने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. यात त्याच्या गळ्यात एक पोकेमॉन ट्रेड कार्ड दिसत आहे. त्याच्या कार्डमुळे त्याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही (Guinness Book of World Records) नाव कोरलं गेलं आहे. त्याचा हा व्हीडिओ आणि फोटो सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, लोगन पॉलला हे PSA 10 ग्रेड पिकाचू इलस्ट्रेटर कार्ड 45 कोटी रुपयांना मिळाले आहे. पॉलने 22 जुलै 2021 रोजी हे कार्ड खरेदी केलं. हे जगातील सर्वात महाग पोकेमॉन ट्रेड कार्ड आहे.”पिकाचू इलस्ट्रेटर हे जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि अत्यंत दुर्मिळ पोकेमॉन कार्ड आहे. 1998 च्या स्पर्धेतील केवळ 39 विजेत्यांना ते मिळाले. यापैकी फक्त एकालाच 10 ग्रेड मिळाले. जे मी खरेदी केलं”, असं लोगान पॉल याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डशी बोलताना सांगितलं.

PSA ग्रेड 10 पिकाचू इलस्ट्रेटर कार्ड मिळविण्यासाठी लोगन पॉल यांना त्यांचं PSA ग्रेड 9 पिकाचू इलस्ट्रेटर कार्ड द्यावं लागलं. जे त्याने इटलीच्या मॅट ऍलनकडून 9.6 कोटींना खरेदी केलं होतं. याशिवाय त्याला कार्डसाठी 30 कोटी रुपये द्यावे लागले. या कार्डची किंमत किंमत सुमारे 45 कोटी रुपये आहे.

सोशल मीडिया स्टार लोगन पॉलने WWE WrestleMania मध्ये प्रवेश केला ही बाब अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारी होती. WWE WrestleMania या शोमध्ये प्रवेश करतानाची त्याची स्टाईलही भलतीच चर्चेत आहे. त्याच्या गळ्यात एक पोकेमॉन ट्रेड कार्ड दिसत आहे. त्याच्या कार्डमुळे त्याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नाव कोरलं गेलं आहे. त्याचा हा व्हीडिओ आणि फोटो सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.

संबंधित बातम्या

Kangaroo in india : भारतातल्या जलपायगुडीत कांगारू? Video viral; काय आहे सत्य? वाचा सविस्तर

Emotional video : एकदा तरी पप्पा तुम्ही या हो सणाला…; कवितेतून पोलिसानं मांडली व्यथा, ऐका

Galapagos tortoise : ‘अभी तो मैं जवान हूँ’; 70व्या वर्षी बाप बनलेल्या ‘या’ कासवाची भलतीच रंगलीय चर्चा

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली