Ajab Gajab : बुटातील सापाने दंश केला, तरीही त्याला कळलंच नाही.. सॉफ्टवेअर इंजिनीअरचा मृत्यू आणि सापही..
Ajab Gajab News : बेंगळुरूमध्ये एक अतिशय विचित्र घटना घडली आहे. तिथे एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचा साप चावल्याने मृत्यू झाला. एवढेच नाही तर या घटनेत सापाचाही मृत्यू झाला. धक्कादायक गोष्ट म्हणजे आपल्लायाल साप चावल्याचं त्याला कळंलही नाही, कारण..

पावसाळ्यात साप आणि विंचूसारखे धोकादायक प्राणी बाहेर पडणे सामान्य आहे. बऱ्याच वेळेस ते घरातही शिरतात. तळ मजल्यावर राहणारे लोकं तर यामुळे नेहमीच भीतीच्या सावटाखाली जगत असतात. अनेकदा असे प्रकार घडतात की पावसामुळे साप बुटांमध्ये घुसतात आणि लपून बसतात. अशावेळी दर कोणी बूट नीट न तपासता तो घातला तर साप त्याला दंश करण्याची शक्यताही खूप वाढते. त्यामुळे पावसाळ्यात चपला, बूट नीट चेक घरून घालावे, असं सांगितलं जातं.बंगळुरूमध्ये यासंदर्भातील अशाच एका प्रकरणाची सध्या खूप चर्चा सुरू आहे. शनिवारी तिथे एका 41 वर्षीय व्यक्तीचा असाच मृत्यू झाला, कारण बुटात लपलेल्या सापाने त्याला दंश केला.
मंजू प्रकाश असे मृताचे नाव आहे. तो बनरघट्टा येथील रंगनाथ लेआउट येथील रहिवासी होता. तो टीसीएसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो यापूर्वी एका अपघातात जखमी झाला होता, ज्यामुळे त्याचा पाय सुन्न झाला होता. आणि पाय सुन्न झाल्याने त्याला साप चावल्यातं कळलं नाही, वेदनाही झाल्या नाहीत. त्यामुळेच त्याला लगेच वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत आणि त्याचा मृत्यू झाला.
रुग्णालयात नेण्यापूर्वीच घेतला अखेरचा श्वास
रिपोर्ट्सनुसार, ही धक्कादायक घटना घडली तेव्हा तो माणूस दुपारी एका दुकानातून क्रॉक्स घालून घरी परतला. त्याने खोलीबाहेर त्याचे क्रॉक्स (चपला) काढले आणि विश्रांतीसाठी गेला. त्याच्या चपलांजवळ मेलेला साप आढळल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना त्याला सापाने दंश केल्याबद्दल कळलं. त्यांनी लगेच त्याच्या खोलीत धाव घेतली, तेव्हा तो माणूस बेडवर पडला होता आणि त्याच्या तोंडातून फेस येत होता. पायातूनही रक्त येत होतं. कुटुंबियांनी त्याला लगेच रुग्णालयात नेलं मात्र डॉक्टरांनी त्याला तेथे मृत घोषित केलं.
सापाचाही झाला मृत्यू
‘मंजू प्रकाश घरी परत आला तेव्हा तो आराम करण्यासाठी थेट त्याच्या बेडरूममध्ये गेला. सुमारे एक तासानंतर, आमच्या घरी आलेल्या एका व्यक्तीला त्याच्या क्रॉक्स बुटाजवळ एक साप दिसला. आम्ही बारकाईने पाहिले तेव्हा आम्हाला आढळले की तो साप मेला होता’ असे त्याच्या भावाने सांगितलं.
चपलेत अडकला होता साप
2016 मध्ये एका बस अपघातात मंजू प्रकाश जखमी झाले होते आहे आणि त्यानंतर त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून त्यांना त्यांच्या पायाच्या त्या भागात काहीही जाणवत नव्हते अशी माहिती समोर आली. त्यामुळे तो साप कदाचित चपलांच्या आत अडकला असेल आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्याचा मृत्यू झाला असेल असे एका नातेवाईकाने सांगितलं.
