Swami Chaitanyananda : नराधम स्वामीने 17 जणींना ओरबाडलं, आता जेलमध्ये रडण्याची वेळ! अंगावर फक्त एक चादर, आता 24 तास…
Swami Chaitanyananda : दिल्लीत १७ विद्यार्थिनींवर लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली स्वामी चैतन्यानंद यांना अटक करण्यात आली. गेल्या पाच दिवसांपासून ते तुरुंगात आहेत. त्यांची तुरुंगात बिकट अवस्था झाल्याचे दिसत आहे.

दिल्लीच्या SRISIIM संस्थेतील १७ विद्यार्थिनींवर लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या आरोपीखाली स्वामी चैतन्यानंद सरस्वतीला अटक करण्यात आली. गेल्या ५ दिवसांपासून स्वामी पोलिस कोठडीत आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी बाबा चौकशीत सहकार्य करत नाही. त्याला आग्राहून अटक करून रविवारी कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर थेट वसंत कुंज नॉर्थ पोलिस स्टेशनला आणण्यात आले. पोलिस स्टेशनला आल्यावर चैतन्यानंदने संध्याकाळीच फळे आणि इतर गोष्टींची मागणी केली. पण सध्या त्याची परिस्थिती बिकट असल्याचे दिसत आहे.
तुरुंगात बिकट अवस्था
दिल्ली पोलिसांच्या DCP, ACP आणि इन्स्पेक्टर रँकच्या अधिकाऱ्यांनी चैतन्यानंदची चौकशी केली. ही चौकशी सुमारे 2 तास चालली. पण चैतन्यानंद पोलिसांना चौकशीत सहकार्य करत नाही. प्रत्येक वेळी तो पोलिसांना आपल्यावर लावलेल्या आरोपांना निराधार सांगतो. चैतन्यानंदला पोलिस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे. तिथे CCTV च्या मदतीने त्याच्यावर 24 तास नजर ठेवली जात आहे. लॉकअपमध्ये चैतन्यानंदला एक चादर आणि कापड दिले गेले आहे. २४ तास बाबाच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे दोन कर्मचारी असतात.
वाचा: बलात्कार इन्स्टाग्रामवर LIVE दाखवला, तीन तरुणींसोबत भयंकर घडलं, पाशवी कृत्याने खळबळ!
स्वामी चैतन्यानंद सरस्वती गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांपासून पळत होता. या काळात तो मथुरेत संत-साधूंमध्ये लपून राहत होता. पोलिसांना आरोपीकडे आयपॅड सापडला आहे. त्यामध्ये त्याने संस्थेच्या परिसरातील सर्व CCTV कॅमेऱ्यांना लिंक केलेले आहे. याच्या मदतीने तो संस्थेच्या परिसरातील प्रत्येक हालचालींवर नजर ठेवत होता. त्याने मुलींच्या हॉस्टेलच्या बाथरूममध्येही हिडन कॅमेरे लावले होते. पोलिसांनी बाथरूमच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणांहून हिडन कॅमेरे शोधून काढले. हे सर्व कॅमेरे थेट स्वामी चैतन्यानंदच्या मोबाइल फोनशी जोडलेले होते. तो विद्यार्थिनी बाथरूममध्ये जाताच व्हिडीओ पाहत असे.
आयपॅडचा पासवर्ड विरसला
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फोनचा पासवर्ड पोलिसांना सांगितला आहे. पण आयपॅडचा पासवर्ड सांगितलेला नाही. अशा परिस्थितीत पोलिसांनी तो तपासणीसाठी FSL ला पाठवला आहे. संस्थेत कार्यरत असलेल्या तिघा महिला अधिकारी श्वेता, भावना आणि काजल आरोपीला मदत करत होत्या. त्यामुळे पोलिस आता तिघांना बाबाला मदत केल्याबद्दल चौकशीसाठी बोलावणार आहेत. पोलिस सूत्रांनी सांगितले की, पोलिस लवकरच तिघांना आणि बाबाला एकत्र बसवून चौकशी करतील.
