Video : कालव्यातून अजगराला बाहेर काढण्यासाठी लावली जीवाची बाजी, आणि…
सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एका कालव्यात भला मोठा अडगर अडकला होता. या अजगराला बाहेर काढण्यासाठी तरुणाने जीवाची बाजी मारली.

सोशल मिडिया हा व्हायरल व्हिडीओनी भरलेलं आहे. नेटकरी आवडणारे व्हिडीओ कायम पाहात असतात. पण एखादा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला की भंबेरी उडल्याशिवाय राहात नाही. असाच एक व्हिडीओ स्क्रोल करताना नेटकऱ्यांच्या समोर आला आणि बघता बघता व्हायरल झाला. यात एक भला मोठा अजगर एका कालव्यात अडकला आहे असं दिसत आहे. इतका मोठा अजगर पाहून कोणीही तिथून पळता पाय घेईल यात शंका नाही. पण एक तरुणाने तसं न करता त्या अजगराला बाहेर काढण्यासाठी जीवाची बाजी लावली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे पुलावर उभ्या असलेल्या इतर लोकांनी त्या तरुणाच्या धाडसाचे कौतुक केले.
व्हायरल व्हिडीओनुसार, सर्वात प्रथम तरुणाने एका आकड्याच्या सहाय्याने अजगराला पाण्यातून वर उचललं. त्यानंतर त्याला पायात पकडलं आणि हाताने धरण्याचा प्रयत्न केला. पण हातातून अजगर निसटत असताना शेवटी शेपटी हातात आली. पण त्या तरुणाने कसलीही तमा न बाळगता. शेपटी गच्च पकडली आणि वर खेचलं. यावेळी अजगराने त्याच्यावर हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला. पण त्या तरुणाने स्वत:ला सांभाळून त्या अजगराला पुलावर खेचून आणलं. त्याच्या या कृतीचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
View this post on Instagram
हा व्हिडीओ @vishalsnakesaver नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आहे. तसेच बघता बघता इतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरही व्हायरल होत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी त्या तरुणाच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. तर काही जणांनी जोखिम घेताना काळजी घ्यावी असा सल्लाही दिला आहे.
