AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video: उंचच उंच इमारतीला आग लागली, विझवणार कशी? नो टेन्शन, ड्रोन आहे ना? पहा व्हिडीओ

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ड्रोन इमारतीला लागलेली भीषण आग विझवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ कुठला आणि काय आहे हा प्रयोग, हेच आपण आज समजून घेणार आहे.

Viral Video: उंचच उंच इमारतीला आग लागली, विझवणार कशी? नो टेन्शन, ड्रोन आहे ना? पहा व्हिडीओ
आग विझवणारे ड्रोन
| Edited By: | Updated on: Oct 14, 2021 | 1:05 PM
Share

बऱ्याचदा मोठ्या शहरामध्ये इमारतींना आगी लागतात. यावेळी मदतीला धावून येतात ते अग्निशमन दलाचे कर्मचारी. हे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता, थेट आग लागलेल्या ठिकाणी शिरतात. बऱ्याचदा आग इतकी भयानक असते, की आगीत अग्निशमन दलाचे कर्मचारी मृत्यूमुखी पडतात किंवा चांगलेच भाजले जातात. अशावेळी गरज निर्माण होते ती मानवविरहीत अग्निशमन साधनांची. अशातच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ड्रोन इमारतीला लागलेली भीषण आग विझवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ कुठला आणि काय आहे हा प्रयोग, हेच आपण आज समजून घेणार आहे. ( The use of drones to extinguish a building fire, video goes viral in China )

आतापर्यंत तुम्ही ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेली सुंदर दृश्यं पाहिली असतील, अगदी ड्रोनद्वारे दहशतवाद्यांवर बॉम्बहल्ला केल्याचंही ऐकलं असेल, एवढंच नाही तर ड्रोनचा वापर करुन, खाद्यपदार्थ ग्राहकापर्यंत पोहचवण्याचेही प्रयोग झाले आहेत. पण, हाच ड्रोन आता आगही विझवू शकतो, हे सांगितल्यावर तुमचा विश्वास बसेल? विश्वास बसण्यासारखं नसलं, तरी ड्रोनद्वारे आग विझवतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात अग्निशमनदलाचे कर्मचारी खाली बसून उंच इमारतीला लागलेली आग विझवताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

चीनच्या सिन्चुआन प्रांतातील चोंगक्विंग शहरातील ही दृश्यं आहे. इथली गुओफी जनरल एव्हिएशन इक्युप्मेंट मॅन्युफ्रॅक्चरिंग कंपनीने हा प्रयोग केला आहे. यासाठी एका उंच इमारतीच्या बाहेर आग लावण्यात आली, आणि 5 अत्याधुनिक ड्रोनला अग्निशमन दलाचे पाणी पाईप लावून ही आग विझवण्याचा प्रयोग करण्यात आला. या व्हिडीओतून तुम्हाला हे तंत्रज्ञान किती उपयोगी आहे हे समजू शकतं.

हेही पाहा:

Video: भन्नाट कॉमेडी करणाऱ्या राजपाल यादव यांचा भन्नाट डान्स, लग्नातील डान्स करतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल

Video: झोक्यावर चढले आणि तोंडावर आपटले, अस्वलांचा हा भन्नाट व्हिडीओ पाहून नेटकरी लोटपोट

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.