Video | 10 सेकंदाची व्हिडीओ क्लिप 48 कोटींना विकली गेली, पाहा काय आहे विशेष ‘या’ व्हिडीओत…

ऑक्टोबर 2020 मध्ये, अमेरिकेच्या मियामी येथे राहणार्‍या एक आर्ट कलेक्टरने ‘या’ 10 सेकंदाच्या कलात्मक व्हिडीओवर 67 हजार डॉलर्स म्हणजेच 49.13 लाख रुपये खर्च केले होते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:23 PM, 3 Mar 2021
Video | 10 सेकंदाची व्हिडीओ क्लिप 48 कोटींना विकली गेली, पाहा काय आहे विशेष ‘या’ व्हिडीओत...
10 सेकंदाची व्हिडिओ क्लिप 48 कोटींना विकली गेली!

मुंबई : आपल्या छोट्या मेहनतीने आणि त्यातून काही पैसे गुंतवून आपले नशीब कधी बदलेल, ते सांगू शकत नाही. ऑक्टोबर 2020 मध्ये, अमेरिकेच्या मियामी येथे राहणार्‍या एक आर्ट कलेक्टरने ‘या’ 10 सेकंदाच्या कलात्मक व्हिडीओवर 67 हजार डॉलर्स म्हणजेच 49.13 लाख रुपये खर्च केले होते. पण, आता ते विकल्यानंतर त्याला या 10 सेकंदाच्या व्हिडीओसाठी तब्बल 6.6 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 48.42 कोटी रुपये मिळाले आहेत (This 10 seconds video clip sold for 48 cr know the reason and see the video).

हा व्हिडीओ डिजिटल आर्टिस्ट बीपल यांनी बनवला आहे. बीपलचे खरे नाव माईक विन्केलेमन आहे. ब्लॉकचेन संस्थेने हे प्रमाणित केले आहे की, हा 10 सेकंदाचा व्हिडीओ माईकनेच बनवला होता. हा व्हिडीओ म्हणजेच डिजिटल मालमत्तेला नॉन-फंजीबल टोकन (एनएफटी) म्हणतात. कोरोना व्हायरस साथीच्या काळात एनएफटी जोरदार प्रचलित झाले आहेत.

गुंतवणूक करणारे अनेक लोक!

जे लोक असे व्हिडीओ बनवतात, त्यांना पैशाची आवश्यकता असते, तर या व्हिडीओमध्ये बरेच लोक गुंतवणूक देखील करतात. कारण एनएफटी डिजिटल प्लॅटफॉर्मवरच राहतात आणि जर कोणाला ते आवडले, तर त्यासाठी कोट्यावधी रुपये देखील मिळतात. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अशा व्हिडीओंचे ऑनलाईन डुप्लिकेशन रोखले जाते.

विकणाऱ्याचे मत…

बीपलचा हा व्हिडीओ विकत घेणारे आर्ट कलेक्टर पाब्लो रॉड्रिग्झ-फ्रेली म्हणाले की, ‘तुम्ही लॉर्व्हला जा, मोनालिसाचे चित्र पाहा. आपण केवळ तिथेच त्याचा आनंद घेण्यास सक्षम असाल. कारण, अशा कामांचा इतिहास तिथेच राहील आणि त्याच वेळी त्यात त्याच्या कार्याचा कोणताही इतर इतिहास नसेल.’ पाब्लो म्हणाले की, बीपलच्या कार्यामुळे मी प्रभावित झालो होतो, म्हणून मी प्रथम त्याला विकत घेतले(This 10 seconds video clip sold for 48 cr know the reason and see the video).

पाब्लो म्हणतात की, माझ्या कामापेक्षा ज्या व्यक्तीने हे तयार केले त्या व्यक्तीसाठी हे अधिक मूल्यवान झाले आहे. इंटरनेटवर नॉन-फेंजिबल टोकन (एनएफटी) डॉलर, स्टॉक किंवा सोन्याच्या विटांसारखे बदलले जाऊ शकत नाही. नॉन-फंक्शनल टोकनमध्ये (एनएफटी) डिजिटल आर्टवर्क, स्पोर्ट्स कार्ड्स, व्हर्च्युअल वातावरण, क्रिप्टोकर्न्सी वॉलेट नेम यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.

काय आहे ‘या’ व्हिडीओत?

पाब्लोने विकलेल्या कलात्मक व्हिडीओमध्ये डोनाल्ड ट्रम्प खाली पडल्याचे दिसून आले आहे. खाली पडलेल्या त्यांच्या शरीरावर बरेच टॅटू बनवले गेले आहेत. अनेक घोषणा दिल्या आहेत. वर ट्विटर पक्षी देखील बसलेला आहे. NFTच्या मार्केटप्लेस ओपनसीने म्हटले आहे की, फेब्रुवारी महिन्यात त्याने 86.3  दशलक्ष डॉलर्स अर्थात 633 कोटी रुपयांपेक्षा जास्तची विक्री केली आहे. तर, मागील वर्षी ते मूल्य दीड दशलक्ष डॉलर्स होते.

पाहा व्हिडीओ:

(This 10 seconds video clip sold for 48 cr know the reason and see the video)

नवे गुंवणूक क्षेत्र

ओपेन्सीचे सहसंस्थापक अलेक्स अताल्लाह म्हणाले की, जर आपण संगणकावरील डिजिटल प्लॅटफॉर्मवर 8 ते 10 तास खर्च केले, तर आपण असे आर्ट तयार करत आहात, जे डिजिटल जगात भावना निर्माण करेल. अ‍ॅलेक्सने असा इशारा देखील दिला आहे की, एनएफटीमध्ये गुंतवणूक करणार्‍यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, त्यांच्या किंमतींचा हा फुगा कधीना कधी फुटू शकेल.

जगातील गुंतवणूकीशी संबंधित इतर क्षेत्रांमध्ये हेही एक नवीन गुंतवणूक व्यासपीठ बनले आहे. येथे कोणत्याही व्हिडीओ आर्टची प्रशंसा केली गेली, तर किंमत जास्त होईल. मात्र, जर कधी या आर्ट संदर्भात अफवा पसरल्या, तर त्याचे काहीच मूल्य उरत नाही.

(This 10 seconds video clip sold for 48 cr know the reason and see the video)

हेही वाचा :

1800 कोटींची लॉटरी जिंकून एक दमडीही मिळाली नाही, नशीबाने ‘असा’ दिला धोका

Video | ‘या’ तरुणाने अवघ्या 17 सेकंदात सोडवले रूबिक क्यूबचे कोडे, सचिनही झाला फॅन