मंदिराजवळ सुरू होतं खोदकाम, अचानक खणखणाट ! चांदीची नाणी अन्… पाहून डोळेच विस्फारले, कुठे सापडला खजिना ?
मुरैना येथील एका मंदिराजवळ खोदकाम सुरू होतं, मात्र तेवढ्यात तेथील मजुरांना एक वेगळात आवाज ऐकू आला. त्यांनी नीट लक्ष देऊन खो़दकाम केलं आणि त्यांच्यासमोर जो खजिना आला त्याने त्यांचे डोळेच विस्फारले.

मध्यप्रदेशमधील मुरैना येथे एका मंदिराजवळ खोदकाम सुरू होतं. येणारे जाणारे तिथूनच वाट काढून चालत होते, आणि मजूर तर मन लावून त्यांचं काम करत होते. मात्र खोजकाम सुरू असतानाच अचानक खण्णं असा आवाजा आला आणि सगळ्यांनीच कान टवकारले. मुजरांन नीट लक्ष देऊन तिथे खोदकाम केलं असता त्यांना चांदीच्या नाण्यांचा मोठा खजिना सापडला. तिथल्या जमिती 1-2 नव्हे तब्बल 45 चांदीची नाणी पुरलेली आढळली. तो खजिना बाहेर आल्यावर गावकऱ्यांचे तर डोळेच विस्फारले. याबद्दल माहिती मिळताच पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारीही गावात पोहोचले. तेथे जाऊन त्यांनी ग्रामस्थ आणि कामगारांच्या उपस्थितीत नाणी जप्त केली आणि त्यांची चौकशी सुरू केली
ही अजबगजब घटना कैलासर तालुक्यातील सागौरिया गावातील आहे. तिथे बुधवारी खोदकाम सुरू होतं, तेवढ्यात तिकडे 500 ग्राम वजनाची 45 चांदीची नाणी सापडली. ही खबर गावात वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि बाकीचे लोकही तो खजिना पाहण्यासाठी गोळा झाले. त्यानंतर पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली. तेऐकून फक्त पोलिसच नव्हे तर त्यांच्यासोबत महसूल विभागाचे अधिकारीही गावात पोहोचले. त्यांनी सर्व नाणी गोळा केली. नंतर ती तपासणीसाठी पाठवली.
उर्दू आणि फारसीत नाण्यांवर कोरली आहेत अक्षरं..
मिळालेल्या माहितीनुसार, सागौरियाचे माजी सरपंच संतोषीलाल धाकड यांच्या पूर्वजांच्या जमिनीवर एक मंदिर बांधण्यात आले आहे आणि या मंदिराजवळ भराव टाकण्यासाठी मजूर माती खोदत होते. मात्र खोदकाम सुरू असताना त्यांना चांदीसारख्या धातूची 45 नाणी सापडली. याबद्दल माजी सरपंच संतोषीलाल धाकड म्हणाले की, ही नाणी 25 पैशांच्या आकाराची आहेत आणि प्रत्येक नाण्याचे अंदाजे वजन 8 ते 10 ग्रॅम आहे. नाण्यांचे एकूण वजन सुमारे 500 ग्रॅम,अर्धा किलो आहे, आणि त्या सर्व नाण्यांवर उर्दू आणि फारसी भाषेत अक्षरे कोरलेली आहेत.
अलीगढमध्ये सापडली होती सोन्याची नाणी
यापूर्वी, उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये कामगारांना सोन्याची 11 नाणी सापडली होती. ही घटना क्वार्सी पोलीस स्टेशन परिसरातील बरहेती गावातील आहे. तिथे पाणी काढण्यासाठी खड्डा खोदण्यात आला होता. या दरम्यान कामगारांना सोन्याची चमकणारी 11 नाणी सापडली. खोदकाम करताना नाणी सापडल्याची बातमी संपूर्ण परिसरात आगीसारखी पसरली. लोकांच्या कानावर ही बातमी पडताच ते लागलीच तेथे पोहोचले, हळूहळू लोकांची गर्दी जमली. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती कळवण्यात आली, तेव्हा त्यांनी घटनास्थळ गाठून खोदकामात सापडलेली ती 11 नाणी जप्त केली.
