VIDEO | पांढरी गाडी, काळं जॅकेट; चालत्या गाडीवर ‘हवा’ करणाऱ्या पठ्ठ्याला पोलिसांनी शिकवला धडा

उत्तर प्रदेशमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारा व्हिडीओ एका तरुणाने सोशल मीडियावर पोस्ट केला. या तरुणाला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. (uttar pradesh police running car video shooting)

VIDEO | पांढरी गाडी, काळं जॅकेट; चालत्या गाडीवर 'हवा' करणाऱ्या पठ्ठ्याला पोलिसांनी शिकवला धडा
तरुणाने अशा प्रकारे कारवर नियमांचे उल्लंघन करुन पुश अप्स काढले.
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 8:13 AM

लखनऊ : सध्या देशात टिकटॉक हे अ‌ॅप बंद करण्यात आलंय. मात्र, छोट-छोटे व्हिडीओ शूट करुन ते सोशल मीडियावर अपलोड करण्याचं व्यसन अजूनही सुटलेलं नाही. इन्स्टाग्राम रिल्स, काही देशी अ‌ॅप यांच्या माध्यामातून अनेकजण छोटे छोटे व्हिडीओ सोशल मीडियावर बिनधास्तपणे अपलोड करतायत. यामध्ये थ्रील करण्याच्या वेडापायी आपण कायदा आणि सुव्यस्थेला पायदळी तुडवतोय याचंदेखील भान अनेकांना राहत नाही. उत्तर प्रदेशमध्ये वाहतुकीचे नियम मोडणारा असाच एक व्हिडीओ एका तरुणाने सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर त्याला उत्तरप्रदेशच्या पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. (Uttar Pradesh police registered complaint against the young video maker for shooting video on running car)

नेमके प्रकरण काय?

उत्तर प्रदेशमध्ये एका तरुणाने चालत्या गाडीवर पुश अप्स केले. सोशल मीडियावर चर्चेत राहण्यासाठी काळा कोट घालून त्याने हा प्रकार केला. त्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर या व्हिडीओची चांगलीच चर्चा झाली. मात्र, हा व्हिडीओ शूट करताना, आपण वाहतूक नियमांची पायमल्ली करतोय, याचे भान त्याला राहिले नाही. चालत्या गाडीवर पुश अप्स करतानाच्या या व्हिडीओमुळे या तरुणाला समाजमाध्यमांवर वाहवा तर मिळाली, पण हा प्रकार पोलिसांच्या नजरेतून सुटला नाही.

नियमांचे उल्लंघन करुन तरुणाने शूट केलेला व्हिडीओ आणि पोलिसांनी शिवकलेला धडा, पाहा या व्हिडीओमध्ये

पोलिसांनी केली कारवाई

भर रस्त्यावर पुश अप्स करणे या तरुणाला चांगलेच महागात पडले. तरुणाच्या या प्रकाराची उत्तर प्रदेश पोलिसांनी दखल घेतली. वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याविरोधात गुन्हासुद्धा नोंदवला. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या तरुणाला दंडसुद्धा भरावा लागला. यावेळी पुश अप करणे आरोग्यासाठी चांगले असले तरी अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तुम्ही कायद्याच्या कचाट्यात सापडाल, असा संदेशही उत्तर प्रदेश पोलिसांनी यावेळी दिला.

दरम्यान, दंड भरवा लागल्यानंतर या तरुणाने असा प्रकार भविष्यात करणार नसल्याचे कबूल केलेय. तसा व्हिडीओसुद्धा उत्तर प्रदेशच्या पोलिसांना आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. यावेळी असले जीवघेणे आणि नियमांचे उल्लंन करणारे प्रकार तरुणांनी करु नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

इतर बातम्या :

Video | बापरे ! केस कापण्यासाठी चक्क चाकू आणि हातोड्याचा वापर, व्हिडीओ एकदा पाहाच

VIDEO | भंडाऱ्यात एकाच घरी निघाले तीन विषारी साप, पाहा थरारक व्हिडीओ

VIDEO | एक्स्प्रेस ट्रेन गायीला धडकली आणि उलटी धावायला लागली, प्रवाशांमध्ये घबराट; लोकोपायलट निलंबित

(Uttar Pradesh police registered complaint against the young video maker for shooting video on running car)

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.