Red Society : लाल ड्रेसमध्ये येते ती स्त्री; हातात देते लाल लिफाफा, फिकट पडतो चेहरा, नंतर…
Red Envelop Society : देशातील अनेक विमानतळावर सध्या एका लाल रंगाचा ड्रेस घातलेल्या स्त्रीची चर्चा आहे. एअरपोर्ट लाऊंजमध्ये ही रहस्यमयी घटना घडत आहेत. त्यात ही लाल रंगाचा ड्रेस घातलेली महिला प्रवाशांना लाल लिफाफा देताना देते, काय आहे हे गूढ, काय आहे हा प्रकार?

Airport Lunge Red Envelop Society : बेंगळुरू विमानतळाच्या लाऊंजमध्ये एक चमत्कारीक घटना समोर आली आहे. येथे एका प्रवाशाने अचानक लाल रंगाचा लिफाफा खाल्ला. हा लिफाफा त्याला काही मिनिटांपूर्वीच सोपवण्यात आला होता. प्रत्यक्षदर्शींनुसार, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला जेव्हा या लाल लिफाफ्याविषयी प्रश्न केला, तेव्हा त्याने कोणतेही उत्तर देण्यापूर्वी त्याचे तुकडे तुकडे केले. ते तुकडे तोंडात टाकले. या लिफाफ्यावर एक सोनेरी मोहोर उमटलेली होती. त्यामुळे हे एक वेगळेच गूढ असल्याचे समोर येत आहे. या प्रकाराची आता जगभर चर्चा होत आहे. काय आहे हा प्रकार?
लिफाफा पाहताच धूम ठोकतात प्रवाशी
गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध एअरपोर्ट लाऊंजमधील लाल लिफाफा दिल्याची प्रकरणे एकामागून उघड होत आहेत. लाल ड्रेस अथवा साडीतील महिला प्रवाशाला लाल लिफाफा देताना दिसू आले आहे. ती एकदम गुपचूप येते. ती कोणतेही शब्द न बोलता, प्रवाशाच्या हातात लिफाफा देते आणि निघून जाते.
लिफाफा हातात घेतलेली लोक बैचेन होतात. घाबरून जातात. तर काही जण विमानतळावरून धूम ठोकतात, असे समोर आले आहे. काहींच्या मते, या लिफाफ्यात एक QR कोड असतो. हा लिफाफा उघडताच क्यूआर कोड गायब होतो. त्यामुळे या घटनांचे रहस्य आणि गूढ वाढले आहे.

लाल रंग सोसायटीची विमानतळावर भीती
काय आहे रेड एन्व्हलेप सोसायटी
सोशल मीडियावर सध्या रेड एन्व्हलेप सोसायटीची जोरदार चर्चा आहे. याविषयीचे अनेक दावे प्रतिदावे करण्यात येत आहे. काही लोक या गटाला एका गुप्त क्लब अथवा मिशनसोबत जोडत आहेत. अजूनही कोणता थांगपत्ता लागलेला नाही. याविषयीचा कोणताही मोठा पुरावा नाही.
बेंगळुरू विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या दाव्यानुसार, ज्या व्यक्तीने लिफाफा पाडला आणि तो खाल्ला, तो घाबरला होता. त्याची ओळख अजून समोर आलेली नाही. त्या लिफाफ्यात नेमकं काय होतं, हे पण अजून समोर आलेले नाही. पण इन्स्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकवर या रेस एन्व्हलप सोसायटीसंबंधीची काही खाती सक्रिय असल्याचा दावा करण्यात येत आहे. red.envelope.society हा काय प्रकार आहे, याविषयी ऑनलाईन युझर्समध्ये कुतुहल वाढत आहे.
