11 वर्षापूर्वीचा सेल्फी पाहून महिलेला बसला शॉक; म्हणाली तो माझा नवरा…

जुन्या सेल्फीमध्ये महिलेने असे काही पाहिले की लग्नाच्या 11 वर्षानंतर तिला धक्का बसला. जेव्हा महिलेने तिचा विचित्र अनुभव सोशल मीडियावर शेअर केला तेव्हा बऱ्याच कमेंट्स आल्या. ही कहाणी तर एकदम फिल्मी आहे, असंही लोकांनी म्हटलं.

11 वर्षापूर्वीचा सेल्फी पाहून महिलेला बसला शॉक; म्हणाली तो माझा नवरा...
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 06, 2024 | 2:19 PM

Selfie : आयुष्यातील सुंदर क्षणांची आठवण ठेवण्यासाठी, लोक अनेकदा फोटो काढतात किंवा सेल्फी घेतात. आपल्यापैकी बरेच जण असे फोटो काढत असतील. खूप वर्षांनी जेव्हा आपण जुने फोटो पाहतो तेव्हा आपण आनंदी होती किंवा कधीकधी भावूकही वाटतं. असाच काहीसा अनुभव एका महिलेला आला. पण खूप जुना फोटो पाहून तिला धक्काच बसला. कारण त्या फोटोमध्ये एक असा चेहरा होता, जो पाहून ती थक्क झाली.

मलेशियातील जेन चिया नावाच्या या महिलेला आश्चर्याचा धक्का बसला कारण सेल्फीमध्ये तिने पाहिलेला चेहरा दुसरा कोणी नसून तिच्या नवऱ्याचा होता. आता तुम्ही विचार करत असाल की स्वतःच्या पतीला पाहून तिला का धक्का बसला असेल ? खरंतर चियाची कथा थोडी फिल्मी आहे. त्या फोटोमध्ये जरी तिने तिच्या नवऱ्याला पाहिलं असलं तरी गमतीची गोष्ट म्हणजे, तेव्हा ते दोघे एकमेकांना बिलकूल ओळखत नव्हते. खरंतर, महिलेने तो सेल्फी काढल्यानंतर, दोन वर्षांनी ते दोघे भेटले.

अनुभव केला शेअर

nypost नुसार, कंटेंट क्रिएटर असलेली चियाने (वय 32) सांगितलं की, तिने हा सेल्फी ऑक्टोबर 2012 मध्ये काढला होता. पण तेव्हा काही ती तिच्या पतीला भेटलेली नव्हती. तिचा पती जॉन लिडेल हा गायक असून तो यूकेमध्ये जन्मला. या फोटोत तो दिसत असला तरी प्रत्यक्षात त्यांची भेट डिसेंबर 2014 मध्ये पहिल्यांदाच झाली. त्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी ऑगस्ट 2023 मध्ये चिया आणि जॉन यांनी लग्न केलं.

तिने हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. ‘ तो फोटो पाहून मी अजूनही थरथरत आहे’ असं तिने लिहीलं होतं. त्या फोटोमध्ये चिया ती एका थिएटरच्या फूड कोर्टमध्ये बसलेली दिसत आहे. तर त्या फोटोत बॅकग्राऊंडमध्ये जॉन (तिचा नवरा) हाही एका ठिकाणी बसलेला आहे. ‘आम्ही दोघे तेव्हा एकाच ठिकाणी होतो, पण एकमेकांच्या उपस्थितीची आम्हाला जाणीव नव्हती’ असंही चियाने नमूद केलं आहे.

‘पण बरं झालं तेव्हा मी जॉनला भेटले नाही, कारण तेव्हा मी एवढी मॅच्युअर नव्हते. आणि कदाचित तेव्हा हे नातंही फार काळ टिकलं नसतं’ असही चियाने आपला अनुभव शेअर करताना लिहीलं. बरं झालं की पुढचा काही काळ सिंगलच राहिले आणि देवाने योग्य वेळी माझी जॉनशी ओळख करून दिली. चियाची ही कहाणी आता TikTok वर व्हायरल झाली आहे आणि लोकांना तिची कथा खूप आवडली आहे. बऱ्याच जणांना तर हे एकदम फिल्मीच वाटलं.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.