8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी, जाणून घ्या चपराशापासून ते आयएएसपर्यंत कोणाचा पगार किती वाढणार?

संपूर्ण देशाचं लक्ष आठव्या वेतन आयोगाकडं लागलं होतं, मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. आठव्या वेतन आयोगाच्या गठणाला मंजुरी देण्यात आली आहे.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी, जाणून घ्या चपराशापासून ते आयएएसपर्यंत कोणाचा पगार किती वाढणार?
Follow us
| Updated on: Jan 16, 2025 | 9:19 PM

संपूर्ण देशाचं लक्ष आठव्या वेतन आयोगाकडं लागलं होतं, मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. आठव्या वेतन आयोगाच्या गठणाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता नव्या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे.अजून आठवा वेतन आयोग गठीत करण्यात आलेला नाही,किंवा त्याबाबतचं चित्र देखील पुरेस स्पष्ट नाही.मात्र आता लवकरच त्याबाबत संपूर्ण चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना भरघोस वेतनवाढ मिळणार आहे, चपराशापासून ते आयएएस अधिकाऱ्यापर्यंत पगारात मोठी वाढ होणार आहे.

आठव्या वेतन आयोगाबाबत अजून कोणतंही चित्र स्पष्ट नाही. मात्र सातव्या वेतन आयोगातील तरतुदीवरून आठव्या वेतन आयोगाचा अंदाज लावला जाऊ शकतो. जाणून घेऊयात जर आठवा वेतन आयोग लागू झाल्यास वर्गवारीनुसार अंदाजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात किती वाढ होऊ शकते.

अंदाजे किती वाढ होऊ शकते?

सातवा वेतन आयोग जेव्हा लागू करण्यात आला होता, तेव्हा लेव्हल वनचे कर्मचारी चपराशी, सफाई कामगार यासारख्या कर्मचाऱ्यांचं बेसिक वेतन 18,000 रुपयांवर पोहोचलं होतं. जर आठवा वेतन आयोग लागू झाला तर त्यांचं बेसिक वेतन 21,300 रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे.लेव्हेल 2 चे जे कर्मचारी आहेत त्यांचं बेसिक वेतन सातवा वेतन आयोग लागू झाला तेव्हा 19,900 इतकं होतं ते आता 23,880 रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे. लेव्हल तीनच्या कर्मचाऱ्याच बेसिक वेतन 21,700 वरून 26,040 रुपये, लेव्हल चारच्या कर्मचाऱ्यांचं बेसिक वेतन 25,500 वरून 30,600 वर तर लेव्हल पाचच्या कर्मचाऱ्याचं वेतन 29,200 वरून 35,040 वर पोहोचण्याची शक्यता आहे.

कर्मचाऱ्यांकडून निर्णयाचं स्वागत

दरम्यान मोदी सरकारकडून आठवा वेतन आयोगाच्या गठणाबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज मिळाली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांकडून मोदी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे. लवकरच वेतन आयोग गठीत केला जाण्याची शक्यता आहे.

'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.