इलेक्ट्रिक कार खरेदी करताय, मग ‘या’ पाच गोष्टी लक्षात ठेवा

Electric Car | मात्र, इलेक्ट्रॉनिक कार खरेदी करताना काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. तुमचे कार्यालय घरापासून किती दूर आहे किंवा इलेक्ट्रिक कारमधून बाहेरगावी किती अंतरापर्यंत प्रवास होऊ शकतो, या सर्व घटकांचा विचार झाला पाहिजे.

इलेक्ट्रिक कार खरेदी करताय, मग 'या' पाच गोष्टी लक्षात ठेवा
इलेक्ट्रिक कार
Follow us
| Updated on: Aug 04, 2021 | 8:13 AM

मुंबई: पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये दिवसेंदिवस होणारी वाढ पाहता आगामी युग हे इलेक्ट्रॉनिक वाहनांचे असेल, अशी चर्चा हल्ली सर्रास कानावर पडते. इलेक्ट्रॉनिक वाहने ही कमी प्रदूषण करणारी असल्याने सरकारकडूनही त्यांच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे भारतात आगामी दोन ते तीन वर्षांत इलेक्ट्रॉनिक कारचा वापर वाढल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

मात्र, इलेक्ट्रॉनिक कार खरेदी करताना काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. तुमचे कार्यालय घरापासून किती दूर आहे किंवा इलेक्ट्रिक कारमधून बाहेरगावी किती अंतरापर्यंत प्रवास होऊ शकतो, या सर्व घटकांचा विचार झाला पाहिजे.

1. तुम्ही इलेक्ट्रिक कार नेमकी कोणत्या वापरासाठी घेत आहात, हे प्रथम निश्चित करा. तुम्हाला शहरामध्येच ये-जा करायची आहे का बाहेरगावी फिरायला जातानाही ही कार लागणार आहे, या प्रश्नांवर विचार करावा. तसेच इलेक्ट्रिक कार एका चार्जिंगमध्ये ठराविक अंतरच पार करू शकते. त्यामुळे आपले ऑफिस किंवा गन्तव्य स्थान किती लांब आहे, याचाही साकल्याने विचार करावा.

2. तुमच्या घरापासून चार्जिंग स्टेशन किती अंतरावर आहे, याचा विचार करा. तुम्ही इलेक्ट्रिक कारने दररोज 50 ते 60 किलोमीटर अंतर प्रवास करत असाल तर ही कार दहा वर्षे चालेल. पेट्रोल पंपाप्रमाणे अजूनही देशात इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्सची संख्या वाढलेली नाही. त्यामुळे चार्जिंग स्टेशनपासून तुमचे घर दूर असल्यास अडचण उद्भवू शकते. एकदा चार्जिंग केल्यानंतर तुम्ही 200 ते 250 किलोमीटर प्रवास करु शकता. त्यादृष्टीने प्रवासाचे नियोजन करावे.

3. तुम्ही कार्यालायतून घरी आल्यानंतर कार चार्जिंग करायचा विचार करत असाल तर तुम्हाला वाट पहावी लागू शकते. 15 एमपीच्या एसी चार्जरने तुम्ही गाडी चार्ज करायला गेलात तर त्यासाठी नऊ तास लागतील. तर फास्ट डीसी चार्जरचा वापर केल्यास एका तासात 80 टक्के गाडी चार्ज होते. शेवटची 20 टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी जास्त वेळ लागतो.

4. तुम्हाला इलेक्ट्रिक कार घेण्याची कितीही इच्छा असली तरी त्याची किंमत हा कळीचा मुद्दा आहे. सुरुवातीच्या काळात तरी इलेक्ट्रिक वाहने ही अन्य वाहनांपेक्षा 20 ते 30 टक्क्यांनी महाग असतील. मात्र, ऑपरेटिंग कॉस्ट बघता इलेक्ट्रिक वाहनेही हा चांगला पर्याय आहे. इलेक्ट्रिक कारने एक किलोमीटर अंतर पार करण्यासाठी तुम्हाला 1.2 ते 1.4 रुपये इतका खर्च येतो. तर पेट्रोलच्या गाडीसाठी प्रतिकिलोमीटर खर्च नऊ रुपये इतका आहे. त्यानुसार इलेक्ट्रिक कारने महिन्यात 800 किलोमीटर प्रवास केला तरी 640 रुपये खर्च येईल. याऊलट पेट्रोल-डिझेलच्या वाहनाचा महिन्याचा खर्च 7200 रुपये इतका आहे.

5. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून खरेदीवर अनुदान दिले जाते. कारच्या खरेदीवर दीड ते दोन लाखांचे अनुदान मिळते. याचा अर्थ इलेक्ट्रिक कारची किंमत 10 लाख रुपये असेल तर तुम्हाला ती आठ लाखांपर्यंत मिळेल. याशिवाय, तुम्हाला कर्जाच्या रक्कमेतही सूट मिळू शकते.

संबंधित बातम्या:

भारतातील सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन तुर्भेत उभारले

इलेक्ट्रिक वाहनं चार्ज करणं सोपं होणार, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरसाठी Tata ची ‘या’ कंपनीसोबत भागीदारी

इलेक्ट्रिक वाहनांसाठी ‘या’ शहरात 100 नवे चार्जिंग स्टेशन उभारणार, राज्य सरकारचा पुढाकार

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.