AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय आहे APK? जिच्या माध्यमातून एका क्लिकवर गायब होतात लाखो रुपये

दिसायला ही APK फाईल अगदी सामान्य वाटते, पण ती फसवणुकीचं मोठं माध्यम ठरू शकते. त्यामुळे कोणत्याही अनोळखी लिंक किंवा फाईलपासून नेहमी सावध राहा. तुम्ही कसे सुरक्षित राहू शकता आणि ही APK फाईल ओळखायची कशी, हे जाणून घ्यायचं असेल तर हा लेख नक्की वाचा

काय आहे APK? जिच्या माध्यमातून एका क्लिकवर गायब होतात लाखो रुपये
| Edited By: | Updated on: Jun 15, 2025 | 1:35 AM
Share

सध्या ऑनलाइन फसवणुकीचे नवनवे मार्ग शोधले जात आहेत आणि या बदलत्या तंत्रज्ञानाच्या दुनियेत सामान्य नागरिकांसाठी सतर्क राहणं अधिक गरजेचं बनलं आहे. आता सायबर ठगांनी एक नवीन क्लृप्ती अवलंबली आहे ती म्हणजे APK फाईलचा वापर. नुकत्याच तेलंगणामधील एका सरकारी कर्मचाऱ्याला याचा फटका बसला असून, त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ४ लाख रुपये उडवले गेले.

काय असते ही APK फाईल?

APK म्हणजे Android Package Kit. ही अँड्रॉइड मोबाइलसाठी अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉल करण्याची फाईल असते. Google Play Store व्यतिरिक्त जर कोणी थेट APK फाईल पाठवून ती इन्स्टॉल करण्यास सांगत असेल, तर ती अत्यंत धोकादायक ठरू शकते. अशा फाईल्समध्ये सहजपणे मालवेअर लपवले जाऊ शकते जे तुमच्या मोबाइलवर पूर्ण नियंत्रण मिळवू शकते.

फसवणुकीचा नेमका प्रकार कसा घडतो?

तेलंगणामधील घटनेत एका ५९ वर्षीय सरकारी कर्मचाऱ्याला ठगाने कॉल करून स्वतःला बँकेचा अधिकारी असल्याचे सांगितले. बँक खात्यातील पत्त्यामध्ये काही चुकीची माहिती असल्याचे सांगून ते अपडेट करण्यासाठी एका फॉर्मवर साईन करण्यास सांगितले. त्यानंतर ठगाने त्यांना एक APK फाईल पाठवली आणि ती इन्स्टॉल करण्यास भाग पाडले. फाईल इन्स्टॉल होताच, ठगाने त्यांच्या फोनचा पूर्ण ताबा मिळवला. काही मिनिटांतच त्यांच्या बँक खात्यातून ३.९२ लाख रुपये गायब झाले.

कसा मिळतो मोबाईलचा अ‍ॅक्सेस?

एकदा ही अज्ञात APK फाईल फोनमध्ये इन्स्टॉल झाली, की ती अ‍ॅप फोनच्या स्क्रीन, कॅमेरा, कॉल, मेसेजेस आणि अगदी बँकिंग अ‍ॅप्सपर्यंत पोहचते. OTP वाचणे, पासवर्ड चोरी करणे, आणि सहज पैसे ट्रान्सफर करणे या सगळ्या गोष्टी ठग करू शकतात आणि हे सर्व घडत असताना मोबाईल वापरकर्त्याला काहीच कळत नाही.

अशा फसवणुकीपासून कसं वाचाल?

नेहमी केवळ अधिकृत Google Play Store किंवा App Store वरूनच अ‍ॅप्स डाउनलोड करा.

अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या APK फाईल्स कधीही डाउनलोड करू नका, जरी त्यांनी स्वतःला बँक अधिकारी, पोलीस किंवा सरकारी कर्मचारी सांगितले तरीही.

फोनच्या सेटिंगमध्ये “Unknown Sources” मधून अ‍ॅप्स इन्स्टॉल करण्याची परवानगी कायम बंद ठेवा.

चुकून एखादी फाईल इन्स्टॉल केल्यास तात्काळ फोन फ्लाईट मोडमध्ये टाका आणि बँकेला कळवा.

फसवणूक झाल्यास तातडीने 1930 (सायबर क्राईम हेल्पलाईन) वर संपर्क करा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा.

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.