ITR Fillings : करदात्यांसाठी महत्वाची अपडेट! ऑनलाईन ITR फॉर्म जारी, या चुका पडतील महागात

ITR Fillings : करदात्यांसाठी महत्वाची घडामोड सुरु आहे. प्राप्तिकर विभागाने आयटीआर फाईलिंग फॉर्म जारी केले आहे. हे फॉर्म उपलब्ध आहेत. पण या चुका टाळल्यातर दंडाचा फटका बसणार नाही.

ITR Fillings : करदात्यांसाठी महत्वाची अपडेट! ऑनलाईन ITR फॉर्म जारी, या चुका पडतील महागात
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 7:31 PM

नवी दिल्ली : करदात्यांसाठी (Tax Payers) महत्वाची घडामोड सुरु आहे. प्राप्तिकर विभागाने आयटीआर फाईलिंग फॉर्म (ITR Filling Form) जारी केले आहे. प्राप्तिकर खात्याने आर्थिक वर्ष 2022-23 आणि मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी ही प्रक्रिया राबविली आहे. करदात्यांना ऑनलाईन आयकर रिटर्न भरण्यासाठी आयटीआर -1 आणि आयटीआर -4 फॉर्म उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ऑनलाईन कर जमा करणाऱ्या करदात्यांना याचा फायदा होईल. करदाते या फॉर्मच्या माध्यमातून आयटीआर फाईलिंग करु शकतात. आयकर खात्याने नोकरदार, व्यावसायिक आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी आर्थिक वर्ष 2022-23 साठी ही सुविधा सुरु केली आहे. इतर आयकर रिटर्न आणि फॉर्म पण लवकरच उपलब्ध होतील. याविषयीची माहिती प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे.

अंतिम मुदत काय प्राप्तिकर विभागाने 25 एप्रिल 2023 रोजी आयटीआर फॉर्म 1 आणि 4 साठी ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध करुन दिले आहे. तुम्ही संकेतस्थळावरुन ते डाऊनलोड करुन घेऊ शकता. आर्थिक वर्ष 2022-23 साठी ज्या करदात्यांच्या खात्याचे ऑडिट करण्याची गरज नाही, त्यांच्यासाठी आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. त्यानंतर फॉर्म भरल्यास दंड भरावा लागेल.

कोणासाठी कोणता फॉर्म आयटीआर फॉर्म 1 हा नोकरदार,ज्येष्ठ नागरिक, व्यावसायिक आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी आहे. तर आयटीआर फॉर्म 4 हा कंपन्या आणि व्यावसायिकांसाठी आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 50 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही, त्यांच्यासाठी हा अर्ज आहे.

हे सुद्धा वाचा

आयटीआर फॉर्ममध्ये बदल जुन्या आणि नवीन कर प्रणालीत स्विच करण्यासाठी ITR-1 आणि ITR-4 मध्ये काही बदल करण्यात आले आहे. आयटीआर दाखल करताना अटी व शर्तींचे पालन करावे लागणार आहे. गेल्या आर्थिक वर्षांत, व्यापारात 60 लाखांहून अधिकची उलाढाल, व्यावसायिक दृष्ट्या गेल्या आर्थिक वर्षात 10 लाख रुपयांहून अधिकची उलाढाल झाली असेल तर गेल्या आर्थिक वर्षात तुमच्याकडून टीडीएस कपात करण्यात येईल.

इकडे लक्ष द्या 50 लाख रुपयांपर्यंत एकूण उत्पन्न असणारे करदाते ITR-1 चा उपयोग करु शकतात. तर ITR-4 व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) आणि व्यावसायिक कमाई करणाऱ्या संस्थांसाठी हा ITR-4 अर्ज आहे. हे फॉर्म या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आयटीआर 2, आयटीआर 3, आयटीआर 5, आयटीआर 6 आणि आयटीआर 7 सोबत दाखल करता येईल. त्यामुळे आयटीआर दाखल करताना योग्य फॉर्म निवडा आणि तो जमा करा.

तर नका भरु कर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी जुन्या कर प्रणालीसोबतच करदात्यांसाठी नवीन कर प्रणालीची ओळख करुन दिली. विशेष म्हणजे या नवीन कर प्रणालीत करदात्यांना 7 लाख उत्पन्नांवर छद्दाम पण देण्याची गरज नाही. पण गुंतवणुकीवरील सवलतीसाठी तुम्हाला जुन्या कर प्रणालीचा आधार घेता येईल.

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.