AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्थसंकल्प – 2025: FD त पैसा गुंतवणाऱ्यांवर काय परिणाम झाला ?

अर्थसंकल्प- २०२५ मध्ये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठी सवलत मिळाली आहे. नवीन टीडीएस मर्यादेमुळे फिस्क्ड डिपॉझिट्स बचतीवर चांगला परतावा मिळून घसघशीच बचत होणार आहे. याचा ज्येष्ठ नागरिकांना फायदा मिळणार आहे.

अर्थसंकल्प - 2025:   FD त पैसा गुंतवणाऱ्यांवर काय परिणाम झाला  ?
| Updated on: Feb 01, 2025 | 9:01 PM
Share

जर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट ( FD ) मध्ये गुंतवणूक करीत आहात. तर तुमच्यासाठी हे बजेट मोठा दिलासा घेऊन आले आहे. अर्थसंकल्पात २०२५ मध्ये अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी फिक्स्ड डिपॉझिटच्या व्याजाच्या उत्पन्नावर टॅक्स सवलतीच्या मर्यादा वाढविण्याची घोषणा केली आहे. आता सर्वसामान्यांसाठी टीडीएसची सीमा ४० हजार रुपयांवरुन वाढवून ५० हजार रुपये केली आहे. म्हणजे आता तुमच्या बचतीचा जास्त पैसा वाचेल आणि टॅक्स देखील कमी कापला जाणार आहे.

नवा टीडीएस नियम काय नेमका?

समजा तर तुमचे वय आता ३५ वर्षे आहे. एका वर्षांत तुम्हाला तुमच्या एफडीवर ५० हजार रुपयांचे व्याज मिळाले आहे. तर नवीन नियमानुसार

TDS मर्यादा : ५०,००० रुपये

TDS कपात : ५०,००० रुपयांवर ० टक्के म्हणजे शून्य कपात

जर व्याजाचे उत्पन्न ५०,००० रुपयांपेक्षा जादा असती तर टीडीएस कापला गेला असता

तुमची ७५ हजाराची व्याजाचे उत्पन्न तुमच्या एकूण उत्पन्नात जोडली जाईल. जर तुमचे एकूण उत्पन्न १२.७५ लाखाहून कमी आहे. तर तुम्हाला टॅक्स द्यावा लागणार नाही. आणि रिटर्न भरताना कापलेल्या टीडीएस तुम्हाला परत मिळणार आहे.

ज्येष्ठांना मिळाला मोठा दिलासा

ज्येष्ठ नागरिकांना ( ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटाचे ) देखील या बजेटमध्ये खास दिलासा मिळाला आहे. त्यांच्या व्याजाच्या उत्पन्नांच्या टीडीएस मर्यादा ५० हजार रुपयांनी वाढवून १ लाख रुपये करण्यात आले आहे. आता ते आपल्या जास्त बचतीवर टॅक्स कपातीपासून वाचू शकणार आहेत.

TDS कसा कामी येतो ?

पगार हे करप्राप्त उत्पन्न असल्याने कंपन्यांना TDS कापावा लागतो

पॅननंबर उपलब्ध झाल्यानंतर १० टक्के टीडीएस कापला जातो

पॅननंबर नसल्यास हा दर २० टक्के होतो

जॉईट एफडीत टीडीएस मुख्य खातेधारकांच्या नावाने कापला जातो

‘वाढवलेली कर सवलत फिक्स्ड डिपॉझिट आणि सॉवरेन बाँडवर मिळणाऱ्या व्याजावर लागू होणार आहे, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिक आपली जादा बचत तुमच्याजवळ राखू शकतात. यामुळे त्यांना चांगले परतावे मिळतील, आर्थिक सुरक्षितता वाढेल, टॅक्स प्रक्रिया सोपी होते आणि त्यांच्या हातात अधिक पैसे येतील,’ असे बँकबाजार डॉट कॉम सीईओचे आदिल शेट्टी यांनी सांगितले.

बचतीसाठी चांगल्या व्याजाचा फायदा मिळणार

जर तुमचा फिक्स्ड डिपॉझिट्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात. तर पाहूयात कोणत्या बँकेत सर्वाधिक व्याज मिळेल…

बँकचे नाव कमाल व्याज दर 1 वर्षाचा दर3 वर्षांचा की दर5 वर्षांचा दर
नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक9% 7% 9% 8%
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक8.60%8.05%8.60% 8.25%
एचडीएफसी बँक7.40%6.60% 7% 7%
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) 7.25%6.80%6.75%6.50%
बंधन बँक 8.05%8.05% 7.25% 5.85%
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक 8.50% 8%8.50% 7.75%
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक8.25% 8.25%7.20% 7.20%
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.