AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधार कार्डवरील मोबाईल नंबर बदलायचा? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस!

आधार नोंदणी केंद्रावर जाताना तुमचं आधार कार्ड आणि ओळखपत्र सोबत ठेवा. तसंच, केंद्र अधिकृत आहे की नाही, हे तपासा. बनावट केंद्रांमुळे तुमची वैयक्तिक माहिती धोक्यात येऊ शकते.

आधार कार्डवरील मोबाईल नंबर बदलायचा? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस!
Aadhaar
| Edited By: | Updated on: May 02, 2025 | 8:12 PM
Share

आजच्या धावपळीच्या जीवनात आधार कार्ड एक महत्त्वाचं ओळखपत्र बनलं आहे. अनेक सरकारी आणि खासगी कामांसाठी याची गरज भासते. आधार कार्डाच्या ऑनलाइन सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर UIDAI सोबत जोडलेला असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण कोणत्याही ऑनलाइन बदलांसाठी तुमच्या मोबाईल नंबरवर OTP (वन टाइम पासवर्ड) येतो आणि या OTP द्वारेच तुमची ओळख निश्चित केली जाते. त्यामुळे आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर नेहमी सुरु ठेवा, जेणेकरून तुम्हाला ऑनलाइन सेवा वापरताना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

अनेक नागरिकांच्या मनात प्रश्न असतो की आधार कार्डमधील मोबाईल नंबर ऑनलाइन पद्धतीने बदलता येतो का? तर या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर आहे, नाही. आधार कार्डमधील मोबाईल नंबर तुम्ही ऑनलाइन अपडेट करू शकत नाही.

मोबाईल नंबर ऑनलाईन अपडेट का होत नाही?

जर तुम्ही नवीन मोबाईल नंबर घेतला असेल आणि तो आधार कार्डशी जोडण्याची किंवा बदलण्याची गरज असेल, तर हे काम ऑनलाइन पद्धतीने शक्य नाही. यासाठी तुम्हाला ऑफलाइन प्रक्रियेचा अवलंब करावा लागेल. सुरक्षेच्या कारणास्तव, UIDAI ने मोबाईल नंबर अपडेट करण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध केलेली नाही. यामुळे तुमच्या आधार डेटाची सुरक्षा अधिक सुनिश्चित केली जाते.

मोबाईल नंबर अपडेट कसा कराल?

आधार कार्डमधील मोबाइल नंबर बदलण्याची प्रक्रिया सोपी आहे. पण ती फक्त ऑफलाईनच करता येते. चला, ही प्रक्रिया पायऱ्यांमध्ये समजून घेऊ.

  1. तुमच्या घराजवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जा.
  2. आधारमध्ये बदल करण्यासाठी करेक्शन फॉर्म भरा.
  3. हा फॉर्म आधार एक्झिक्युटिव्हकडे जमा करा.
  4. बायोमेट्रिक माहिती देऊन तुमच्या तपशीलांची पडताळणी करा.
  5. यासाठी 50 रुपये शुल्क भरावं लागेल.
  6. तुम्हाला एक पावती मिळेल. यामध्ये अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) असेल. या नंबरद्वारे तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती तपासू शकता.
  7. काही दिवसांत तुमचा मोबाइल नंबर आधारशी जोडला जाईल.

त्यामुळे, जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमधील मोबाईल नंबरमध्ये बदल करायचा असेल, तर आता तुम्हाला ऑनलाइन पर्याय उपलब्ध नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तुम्ही सहजपणे तुमच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट देऊन ही ऑफलाइन प्रक्रिया पूर्ण करू शकता.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.