DA Hike Update: महागाईत ही सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी, कर्मचा-यांना महागाई भत्त्याचे घसघशीत ‘गिफ्ट’ !

एकीकडे महागाई विक्रम मोडत असताना, कर्मचा-यांना त्याची झळ बसू नये यासाठी केंद्राने कंबर कसली आहे. पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाच्या कर्मचा-यांच्या पदरात महागाई भत्त्याचे घसघशीत गिफ्ट पडणार आहे

DA Hike Update: महागाईत ही सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी, कर्मचा-यांना महागाई भत्त्याचे घसघशीत 'गिफ्ट' !
DA hike
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 8:07 AM

मुंबई :  केंद्रीय कर्मचा-यांना मोदी सरकारने ऐन उन्हाळ्यात महागाई भत्याचे (Dearness Allowance) गिफ्ट देऊ केले आहे. त्यामुळे एकीकडे महागाई आणि दुसरीकडे उष्ण झळांनी बेजार झालेल्या कर्मचा-यांना दिल गार्डन गार्डन हो गया असे न वाटल्यास वावगे ठरणार नाही. यापूर्वी केंद्र सरकारच्या (Central Government) लाखो कर्मचा-यांना नुकताच महागाई भत्ता मिळाला आहे. सातव्या वेतन आयोगातंर्गत (7th Pay Commission) येणा-या सर्व कर्मचा-यांना आणि निवृत्तीवेतनधारकांचा महागाई भत्त्यात सरकारने अगोदरच घसघशीत वाढ केली आहे. आता पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगातंर्गत येणा-या कर्मचा-यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. त्यांना महागाईमुळे त्यांचं मुश्कील झालेलं जगणं सुसह्य करण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे. त्यासाठी पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाच्या (5th & 6th Pay Commission) कर्मचा-यांनाही महागाई भत्ता देण्यासाठी सरकारने सर्व पातळ्यांवर कसरत केली असून लवकरच महागाई भत्याची भेट कर्मचा-यांच्या खात्यावर पडेल. जानेवारी 2022 पासूनचा महागाई भत्ता कर्मचा-यांना लागू होईल आणि एकदाच तीन महिन्यांचा डीए कर्मचा-यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल.

इतका वाढेल महागाई भत्ता

अर्थ मंत्रालयाच्या जमा-खर्चासंबंधी विभागानुसार, 5 व्या आणि 6 व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत येणा-या कर्मचा-यांना 13 टक्के महागाई भत्ता मिळू शकतो. पाचव्या वेतन आयोगाच्या कर्मचा-यांना सध्या 368 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. यामध्ये 13 टक्के वाढ करुन तो 381 टक्के करण्याचा विचार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने तयारी पूर्ण केली आहे. तर सहाव्या वेतन आयोगाच्या कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात ही वाढ करण्यात येणार आहे. सध्या कर्मचा-यांना 196 टक्के महागाई भत्ता देण्यात येतो. त्यात वाढ करुन तो 203 टक्के करण्यात येणार आहे. या कर्मचा-यांच्या भत्त्यात 7 टक्के वाढ अपेक्षित आहे.

तीन महिन्यांचा डीए एकदाच

पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाच्या कर्मचा-यांनाही महागाई भत्ता देण्यासाठी सरकारने सर्व पातळ्यांवर कसरत केली असून लवकरच महागाई भत्याची भेट कर्मचा-यांच्या खात्यावर पडेल. जानेवारी 2022 पासूनचा महागाई भत्ता कर्मचा-यांना लागू होईल आणि एकदाच तीन महिन्यांचा डीए कर्मचा-यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल.

असा देण्यात येतो डीए

महागाई भत्ता कर्मचा-यांना त्यांच्या वेतनाच्या आधारावर देण्यात येतो. शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागातील कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात फरक असतो. तो या क्षेत्रानुसार बदलतो. महागाई भत्ता हा मूळ वेतनाच्या आधारे देण्यात येतो. महागाई भत्त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. कर्मचा-यांच्या मूल्य सुचकांआधारे हा भत्ता देण्यात येतो.

संबंधित बातम्या :

UPI Payment : एकाच दिवशी 10 कोटींचा व्यवहार, तर महिनाभरात 2.5 अरबोंचा टप्पा पार, युपीआय पेमेंट अ‍ॅप कंपन्यांमध्ये स्पर्धा भडकणार

टाटा समुहाकडून लवकरच UPI अ‍ॅप लाँच; Google Pay आणि Phone Pe ला देणार जोरदार टक्कर

UPI पेमेंट करताना रहा सावधान, नाहीतर व्हाल कंगाल; सुरक्षीत पेमेंट हीच खात्यातील रकमेची हमी 

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.