वेटिंग लिस्टमध्ये ताटकळत बसू नका, कन्फर्म तिकीट कसे मिळवाल?

Railway Ticket Booking | तुम्ही तिकीट बूक करताना काही क्लृप्त्या वापरल्या तर तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता अधिक वाढते. अनेकदा तुमच्या स्थानकात कन्फर्म तिकीट उपलब्ध नसते. पण तीन-चार स्थानके सोडून तिकीट काढायला गेले तर कन्फर्म तिकीट उपलब्ध होते.

वेटिंग लिस्टमध्ये ताटकळत बसू नका, कन्फर्म तिकीट कसे मिळवाल?
रेल्वे कन्फर्म तिकीट
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 3:35 PM

नवी दिल्ली: तुम्हाला लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांनी प्रवास करायचा असेल तर बऱ्याचदा तिकीट आरक्षण हा एक डोकेदुखीचा भाग असतो. काही दिवसांपूर्वी तिकीट आरक्षित झाले तर ते सहज मिळते. मात्र, ऐनवेळी तुम्हाला बाहेरगावी जायचे असेल तर रेल्वेचे कन्फर्म तिकीट (Railway Ticket) मिळवणे, ही एक दिव्य गोष्ट असते. गरजेपोटी अनेकजण तिकीट काढून वेटिंग यादीत ताटकळत बसतात. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत आपले तिकीट कन्फर्म होईल की नाही, याची टांगती तलवार प्रवाशांवर असते. (Confirm Railway Ticket know how to book train confirm seat without waiting list)

मात्र, तुम्ही तिकीट बूक करताना काही क्लृप्त्या वापरल्या तर तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता अधिक वाढते. अनेकदा तुमच्या स्थानकात कन्फर्म तिकीट उपलब्ध नसते. पण तीन-चार स्थानके सोडून तिकीट काढायला गेले तर कन्फर्म तिकीट उपलब्ध होते. या सगळ्या गोष्टी संगणक प्रणालीतील आज्ञावलीवर अवलंबून असतात. संगणक प्रणालीच कोणते तिकीट वेटिंगमध्ये ठेवायचे आणि कोणते तिकीट कन्फर्म करायचे, हे ठरवते.

किती सीट खाली असतात?

एखाद्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये 1000 सीटस असतील तर त्या सर्वच्या सर्व सामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध नसतात. वेगवेगळ्या कोट्यामुळे अनेक सीट आरक्षित असतात. यामध्ये लेडिज कोटा, सिटीझन कोटा, एचओ कोटा, व्हीआयपी कोटा यांचा समावेश असतो. त्यामुळे 1000 सीटपैकी केवळ 480 सीट सामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध असतात.

त्यानंतर प्रत्येक स्थानकानुसार उर्वरित सीटसचे वाटप केले जाते. एखादी ट्रेन बरौन ते दिल्ली असा प्रवास करत असेल तर हाजीपूर, गोरखपूर, लखनऊ आणि कानपूर या बड्या स्थानकांसाठी वेगळा कोटा असतो. 480 पैकी जवळपास 80 जागा स्थानकांच्या कोट्यासाठी खर्ची पडतात. त्यानंतर सामान्य प्रवाशांसाठी पुन्हा 400 जागाच उरतात. त्यामुळे यापुढे तिकीट आरक्षित झाल्यास ते वेटिंग श्रेणीत जाते. एखाद्या व्यक्तीने सुरुवातीच्या स्थानकापासून शेवटच्या स्थानकापर्यंत प्रवास करायचे ठरवले तर त्याला GNWL कोट्यातून तिकीट मिळते. मात्र, एखाद्या प्रवाशाने कोणत्याही मधल्या स्थानकापासून प्रवास करायचे ठरवले तर त्याला Pulled कोट्यातून तिकीट मिळते. अनेकजण सुरुवातीच्या स्थानकापासून शेवटपर्यंत प्रवास न करता मध्येच गाडीत चढतात आणि उतरूनही जातात. अशा लोकांना रिमोट कोटा वेटिंग लिस्टमधून तिकीट दिले जाते. त्यामुळे कन्फर्म तिकीट हवे असल्यास ही क्रमवारी लक्षात घ्यावी.

सर्वप्रथम जनरल वेटिंग, त्यानंतर Pulled कोटा आणि शेवटी रिमोट कोटिंग अशा क्रमाने तिकीटे कन्फर्म होतात. त्यामुळे सर्वप्रथम जनरल कोट्यातील तिकीट कन्फर्म होते. त्यामुळे तुम्हाला वेटिंग तिकीट कन्फर्म करायचे असेल तर आपल्या नजीकच्या एका मोठ्या स्थानकातून तिकीट बूक करावे. त्यामुळे कन्फर्म तिकीट मिळण्याच्या शक्यता वाढतात.

(Confirm Railway Ticket know how to book train confirm seat without waiting list)

Non Stop LIVE Update
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.