संपूर्ण घरासाठी लागणाऱ्या वीजेची निर्मिती सौरउर्जेतून करायचेय? जाणून घ्या किती सोलर पॅनल लागतील?

Solar Energy | तुमच्या घरासाठी किती किलोवॅटचा सोलर प्लांट लागेल हे तुम्हाला किती वीज लागते यावर अवलंबून आहे. तुम्हाला महिन्याला वीजेचे बिल 1000 रुपये येत असेल तर 1 किलोवॅटचा प्लांट तुमच्यासाठी योग्य आहे. 10 हजार रुपये वीजेचे बील असेल तर त्या घरासाठी 10 किलोवॅटचा सोलर प्लांट लागेल.

संपूर्ण घरासाठी लागणाऱ्या वीजेची निर्मिती सौरउर्जेतून करायचेय? जाणून घ्या किती सोलर पॅनल लागतील?
सौरउर्जा
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 10:34 AM

मुंबई: देशातील अनेक खेड्यांमध्ये आजही वीज पोहोचलेली नाही. अशा भागांमध्ये सौरउर्जा हा एक उत्तम आणि कार्यक्षम पर्याय ठरु शकतो. तुम्ही संपूर्ण घरासाठी लागणारी वीज सौरउर्जेच्या (Solar Energy) माध्यमातून निर्माण करू शकता. सुरुवातीला सोलर पॅनल्सचा खर्च वगळता सौरउर्जेच्या माध्यमातून वीजनिर्मितीसाठी फारसा खर्च येत नाही.

अलीकडच्या काळात कमी खर्च आणि शुद्ध उर्जेचा पर्याय म्हणून सौरउर्जेकडे पाहिले जाते. त्यामुळे अनेकजण घरावर सोलर प्लांट (Solar Plant) लावण्याला प्राधान्य देत आहेत. मात्र, यासाठी नेमका किती खर्च येतो आणि काय करावे लागते, याविषयी बऱ्याचजणांना माहिती नसते. किती किलोवॅट क्षमतेचा सोलर प्लांट घरासाठी पुरेसा होईल, याची माहिती खालीलप्रमाणे.

घरासाठी किती किलोवॅटचा सोलर प्लांट?

तुमच्या घरासाठी किती किलोवॅटचा सोलर प्लांट लागेल हे तुम्हाला किती वीज लागते यावर अवलंबून आहे. तुम्हाला महिन्याला वीजेचे बिल 1000 रुपये येत असेल तर 1 किलोवॅटचा प्लांट तुमच्यासाठी योग्य आहे. 10 हजार रुपये वीजेचे बील असेल तर त्या घरासाठी 10 किलोवॅटचा सोलर प्लांट लागेल.

किती वीजेची निर्मिती होते?

10 किलोवॅट प्लांटच्या माध्यमातून महिन्याला 1200 युनिट वीजेची निर्मिती होते. त्यानुसार तुम्ही तुमच्या घरासाठी सोलर प्लांटची निवड करावी. 10 किलोवॅटच्या सोलर प्लांटसाठी तुम्हाला साधारण 4 लाख रुपये इतका खर्च येतो. तर 5 किलोवॅटच्या सौरउर्जा प्लांटसाठी 2.5 लाख रुपये इतका खर्च येतो. सौरउर्जेचा प्लांट लावण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते. केंद्र सरकार यासाठी 20 टक्के तर प्रत्येक राज्यानुसार अनुदानाचे वेगवेगळे नियम आहेत.

‘या’ राज्यात उभारले जाणार देशातील सर्वात मोठं सोलर पार्क

एनटीपीसी रिन्यूबल एनर्जी लिमिटेडकडून गुजरातमधील कच्छच्या वाळवंटात 4,750 मेगावॅट क्षमतेचे सोलर पार्क उभारले जाणार आहे. केंद्रीय उर्जा मंत्रालयाकडून नुकतीच या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. हे देशातील सर्वात मोठे सोलर पार्क ठरणार आहे. भारत-पाकिस्तान सीमारेषेजवळ असणाऱ्या कच्छच्या वाळवंटात उभारल्या जाणाऱ्या या सोलर पार्कमध्ये अनेक कंपन्यांना यापूर्वीच सौर आणि पवन उर्जेच्या प्रकल्पांसाठी जमिनी ताब्यात देण्यात आल्या आहेत. एनटीपीसीचा प्रकल्प खवडा आणि विघकोट या गावांच्या परिसरात असेल.

सध्या गुजरातला 18000 मेगावॅट वीज लागते. राज्यात सध्याच्या घडीला 30,500 मेगावॅट वीजेची निर्मिती करणारे प्रकल्प आहेत. यापैकी 11,264 मेगावॅट क्षमतेचे वीजप्रकल्प हे रिन्यूबल एनर्जी प्रकारात मोडणारे आहेत. गेल्या 12 वर्षात ही क्षमता दहापटीने वाढली आहे. कच्छच्या वाळवंटातील नव्या सोलार पार्कमुळे स्थानिक लोकांना मोठ्याप्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. या सोलर पार्कसाठी अनेक तंत्रज्ञांची गरज लागणार आहे. त्यामुळे स्थानिक तरुणांना नोकऱ्या मिळू शकतात.

संबंधित बातम्या:

सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सरकारी संस्था, विद्यापीठांचं सहकार्य घ्या, नितीन राऊत यांची महावितरणला सूचना

नोकरी शोधण्यापेक्षा 70 हजारात ‘हा’ व्यवसाय सुरु करा आणि कमवा लाखो रुपये

आता सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करा, ‘महावितरण’कडून वेबसाईट लॉन्च

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.