रेशनच्या दुकानात अनेक महिने फिरकला नाहीत, मग रेशनकार्ड रद्द होण्याची शक्यता, जाणून घ्या नियम

Ration card | राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारक कुटुंबांना अन्नधान्य पुरवले जाते. यामध्ये, कुटुंबातील सदस्यांच्या संख्येच्या आधारावर, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत, सरकार लोकांना स्वस्त दरात रेशन पुरवते.

रेशनच्या दुकानात अनेक महिने फिरकला नाहीत, मग रेशनकार्ड रद्द होण्याची शक्यता, जाणून घ्या नियम
रेशनकार्ड


नवी दिल्ली: देशातील गरीब कुटुंबांना रेशन कार्डच्या आधारावर स्वस्त दरात धान्य मिळते. रेशन कार्ड बनवण्याची जबाबदारी राज्य सरकारांची आहे. त्याच यादी वेळोवेळी अपडेट करून, लोकांना स्वस्त दरात धान्य पुरवले जाते. तथापि, विसंगती आढळल्यास, रेशन कार्ड देखील रद्द केले जाते. अनेक कारणांमुळे रेशन कार्ड रद्द होऊ शकतात. जर तुम्ही दीर्घकाळ अन्नधान्य घेण्यासाठी तुमचे रेशन कार्ड वापरले नाही, तर तुमचे कार्ड रद्द होऊ शकते.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारक कुटुंबांना अन्नधान्य पुरवले जाते. यामध्ये, कुटुंबातील सदस्यांच्या संख्येच्या आधारावर, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत, सरकार लोकांना स्वस्त दरात रेशन पुरवते.

तुम्ही कोणत्या महिन्यात किती रेशन घेतले आणि तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत. अशी सर्व माहिती रेशन कार्डमध्ये आहे. तुमच्या नावावर रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला रेशनच्या दुकानात धान्य मिळेल.

काय आहे नियम?

रेशन कार्ड धारकाने सहा महिन्यांपासून रेशन घेतले नाही, तर असे मानले जाते की त्याला स्वस्त दरात उपलब्ध अन्नधान्याची गरज नाही किंवा तो रेशन घेण्यास पात्र नाही. अशा परिस्थितीत, या कारणांच्या आधारावर, ज्या व्यक्तीने सहा महिन्यांपासून रेशन घेतले नाही त्याचे रेशन कार्ड रद्द केले जाते. राजधानी दिल्ली, बिहार, झारखंडमध्येही रेशनबाबत असेच नियम लागू आहेत.

जर तुमचे रेशन कार्ड रद्द झाले तर तुम्ही ते पुन्हा सुरु करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या राज्यातील AePDS च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तुम्ही भारतभर AePDS रेशन कार्ड पोर्टल ला भेट देऊन ते पुन्हा सक्रिय करू शकता.

रेशनकार्ड पुन्हा सुरु कसं कराल?

* सर्वप्रथम राज्य किंवा केंद्रीय AePDS पोर्टलवर जा.
* येथे रेशन कार्ड करेक्शन पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.
* रेशन कार्ड सुधारणा पृष्ठावर जा आणि आपला रेशन नंबर शोधण्यासाठी फॉर्म भरा.
* जर तुमच्या शिधापत्रिकेच्या माहितीमध्ये काही चूक असेल, ज्यामुळे ती रद्द केली गेली असेल तर ती दुरुस्त करा.
* सुधारणा केल्यानंतर, स्थानिक PDS कार्यालयाला भेट द्या आणि पुनरावलोकन अर्ज सबमिट करा.
* जर तुमचा रेशन कार्ड सक्रिय करण्याचा अर्ज स्वीकारला गेला तर तुमचे रद्द केलेले रेशन कार्ड पुन्हा सक्रिय केले जाईल.

संबंधित बातम्या:

Business Ideas: चार लाखांच्या भांडवलात ‘हा’ व्यवसाय सुरु करा; महिन्याला बक्कळ पैसा कमवा

मोदी सरकारच्या e-Shram पोर्टलवर 4 कोटी कामगारांची नोंदणी; महिलांकडून प्रचंड प्रतिसाद

Income Tax: गुंतवणूक करताना ‘या’ गोष्टी पाळा आणि 40 हजारापर्यंत टॅक्स वाचवा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI