AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ लिंकवर क्लिक करणे पडेल महागात, इंडिया पोस्टने दिला इशारा, अन्यथा बॅंक खाते होईल रिकामे

इंडिया पोस्टने एका वेबसाईटची लिंक ट्विट करत लोकांना त्यावर न जाण्याचे आवाहन केलं आहे. लकी ड्रॉ असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करण्याचे काम करणारी ही बनावट वेबसाइट असल्याचे इंडिया पोस्टने म्हटले आहे.

'या' लिंकवर क्लिक करणे पडेल महागात, इंडिया पोस्टने दिला इशारा, अन्यथा बॅंक खाते होईल रिकामे
| Updated on: Apr 23, 2022 | 4:14 PM
Share

इंटरनेटचा ट्रेंड वाढला तसा याच्या मदतीने फसवणूकीचे (Online Fraud) प्रकारही वाढले. सध्याच्या काळात व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा (Social Media Platforms) सर्वच जण वापर करत आहेत. संवादाच्या या प्लॅटफॉर्मचा वापर फसवणूक आणि घोटाळ्यांसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. दरम्यान, इंडिया पोस्टने (India Post) लोकांना कोणत्याही प्रकारची ऑनलाइन फसवणुकीपासून सावधान राहण्याचा सल्ला दिला आहे. यासंदर्भात पत्र सूचना कार्यालयाने (PIB) ट्विट करून लोकांना इशारा दिला आहे. अशा कोणत्याही फसवणूक करणाऱ्या संकेतस्थळापासून चार हात दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. लकी ड्रॉ असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करण्याचे काम करणारी ही बनावट वेबसाइट असल्याचे इंडिया पोस्टने म्हटले आहे. अशा फसव्या संदेशाकडे पाठ फिरवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच अशाप्रकारे फसवणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. PIBच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, वेबसाइटचा यूआरएल आणि लिंक वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली जात आहे. या लिंकवर क्लिक करून काही सोप्या प्रश्नांची उत्तरे दिली तर सरकारी अनुदानाचा लाभ मिळेल असा दावा यामध्ये करण्यात आला आहे.

इंडिया पोस्टचा कोणताही संबंध नाहीं

टपाल खात्याने कोणतेही बक्षिस किंवा बोनस जाहीर केलेला नाही. एखाद्या व्यक्तीला असा मेसेज, लिंक, यूएल किंवा व्हिडिओ मेसेज आला तर तो टाळा. लिंकवर क्लिक करू नका आणि स्वत: बद्दलची कोणत्याही प्रकारची माहिती अजिबात शेअर करू नका, असे टपाल खात्याने स्पष्ट केले आहे.

लकी ड्रॉच्या मदतीने लुबाडण्याचा प्रयत्न

लकी ड्रॉ असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करण्याचे काम करणारी ही बनावट वेबसाइट असल्याचे टपाल खात्याने म्हटले आहे. खाते क्रमांक, मोबाइल क्रमांक, जन्मस्थळ, आधार क्रमांक, ओटीपी अशी माहिती शेअर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. युआरएलचा आधार घेत नागरिकांची फसवणूक करण्यात येत आहे. त्यामुळे अशा फसव्या संदेशाकडे पाठ फिरवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच अशा लोकांपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

तुम्हीपण करु शकता शहानिशा

पीआयबी फॅक्ट चेक टीम समाज माध्यमांवरील अनेक अशा पोस्टचा समाचार घेत असते. त्यांची शहानिशा करुन त्यांचा खरेखोटेपणा समोर आणत असते. तुम्हाला अनेक दाव्यांची सत्यता तपासायची असेल तर तुम्ही +918799711259 या क्रमांकावर व्हाट्सअप करु शकता अथवा socailmedia@pib.gov.in या ईमेलवर मेल करु शकता. तसेच पीआयबीच्या ट्विटर हँडलवर, फेसबूक आणि इन्स्टाग्रामवर पोस्टची शहानिशा करु शकता.

संबंधित बातम्या

Economic crisis in Sri Lanka; श्रीलंकेला भारताचा मदतीचा हात, इंधन खरेदीसाठी 50 कोटी डॉलरचे कर्ज

India will be a superpower : अमेरिकेला मागे टाकत भारत होणार महासत्ता, इतक्या दिवसांत गरिबी काढणार पळ; गौतम अदानी यांचा दावा

RBI कडून सेंट्रल बँक ऑफ इंडियाला 36 लाखांचा दंड! नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.