IRCTC Password : आयआरसीटीसीचा पारवर्ड विसरला? काळजी नको, असा परत मिळवा

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Nov 02, 2021 | 9:34 AM

रेल्वेनं उपलब्ध करुन दिलेलं आयआरसीटीसी हे व्यासपीठ खूप महत्वाचं आहे. कारण, या द्वारे तुम्ही फक्त रेल्वे तिकीट बुकिंगच नाही, तर रेल्वेतील खानपान, पर्यटन, आदीसाठी आयआरसीटीसी खूप फायदेशीर आहे. मात्र, रेल्वे तिकीट बूक करताना आयआरसीटीसी पासवर्ड लक्षात असणं गरजेचं आहे. पण तुमच्याकडून पासवर्ड विसरला असेल तर काळजीचं कारण नाही.

IRCTC Password : आयआरसीटीसीचा पारवर्ड विसरला? काळजी नको, असा परत मिळवा

मुंबई : तंत्रज्ञानाच्या युगात तुम्हाला अनेक गोष्टी तुमच्या मोबाईलवर उपलब्ध झाल्या आहेत. त्या बँकिंग सुविधांसह अनेक बाबींचा समावेश आहे. अशावेळी महत्वाच्या बाबींचा आयडी आणि पासवर्ड लक्षात ठेवणं काहीसं कठिण जातं. मात्र, तो लिहून ठेवणं हा एक चांगला पर्याय आहे. पण कधी-कधी कामाच्या गडबडीत आपल्याला ते करणंही शक्य होत नाही. मग पासवर्ड विसरला जातो आणि आपली डोकेदुखी वाढते. पण रेल्वे बुकिंगसाठी उपयुक्त ठरणाऱ्या आयआरसीटीसीचा पासवर्ड तुम्ही विसरला असाल तर काळजीचं कारण नाही. कारण तुम्ही नवा पासवर्ड पुन्हा मिळवू शकता. (easy way to recover an IRCTC password if you have forgot)

दिवाळी किंवा अन्य सणानिमित्त लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रवास होतो. या प्रवासासाठी बहुतांश लोक रेल्वेचा पर्याय निवडतात. कारण भारतात सध्या तरी सर्वात स्वस्त, आरामदायी आणि जलद प्रवास हा रेल्वेचा मानला जातो. अशावेळी रेल्वेनं उपलब्ध करुन दिलेलं आयआरसीटीसी हे व्यासपीठ खूप महत्वाचं आहे. कारण, या द्वारे तुम्ही फक्त रेल्वे तिकीट बुकिंगच नाही, तर रेल्वेतील खानपान, पर्यटन, आदीसाठी आयआरसीटीसी खूप फायदेशीर आहे. मात्र, रेल्वे तिकीट बूक करताना आयआरसीटीसी पासवर्ड लक्षात असणं गरजेचं आहे. पण तुमच्याकडून पासवर्ड विसरला असेल तर काळजीचं कारण नाही. आम्ही तुम्हाला तुमचा आयआरसीटीसीचा पासवर्ड परत मिळवण्याची पद्धत सांगणार आहोत.

आयआरसीटीसीवर पासवर्ड परत मिळवण्याची प्रक्रिया

 1. सुरुवातीला आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवर जा
 2. त्यानंतर तुमचं आयआरसीटीसी खात्याचं लॉगिन आयडी टाका
 3. खाली देण्यात आलेला Forgot Password हा पर्याय निवडा
 4. तुमचा रजिस्टर्ड ई-मेल, पत्ता आणि आयआरसीटीसी यूजर आयडी, जन्म तिथी आणि कॅप्चा कोड टाका
 5. आयआरसीटीसीकडून तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड ई-मेल आयडीवर एक विवरण पाठवलं जाईल
 6. त्याच्या मदतीनं तुम्ही तुमच्या यूजर आयडी आणि पासवर्ड रिकव्हर करु शकता
 7. एकदा तुम्ही आपलं आयआरसीटीसी खाते लॉगिन केले की तुम्ही तुमच्या पद्धतीने पासवर्ड बदलू सकता
 8. त्यानतंर आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन Forgot Password पेजवर जाल
 9. नवा बनवलेला पासवर्ड आपल्या जुन्या पासवर्डनुसार नोंद करा आणि नवा पासवर्ड टाका
 10. तुमचे सर्व विवरण आणि वॉईला जमा करा, तुमच्या पासवर्ड बदलला आहे
 11. एकदा ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर तुम्ही नव्याने तयार केलेल्या पासवर्डद्वारे आयआरसीटीसी खात्यात लॉगिन करु शकता

IRCTC च्या वेबसाईटवर खाते कसे बनवाल?

तुम्ही आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवर एक खाते उघडू शकता, जे तुम्ही एखाद्या दुसऱ्या वेबसाईटवर बनवलेल्या खात्यासमान असू शकेल. त्यानंतर तुमचा संपर्क क्रमांक, तुमचा मेल आयडी, एक पासवर्ड आणि अन्य प्रकियेसह सुरक्षेसंबंधी एक प्रश्नाचाही त्यात समावेश असेल. तुम्ही एकदा आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवर खाते सुरु केल्यास नंतर सोप्या पद्धतीने लॉगिन करु शकता आणि तिकीट बूक करु शकता.

इतर बातम्या :

PPF: 12500 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला निवृत्तीनंतर बनवणार करोडपती, जाणून घ्या…

Gold price: दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा भावात किंचित वाढ, चांदीच्या भावात घसरण

easy way to recover an IRCTC password if you have forgot

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI