AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या काही दिवसात करा पैसे दुप्पट, टपाल खात्याची केवीपी योजना

गुंतवणुकीचे अनेक पर्याय सध्या देशात उपलब्ध आहेत. यात एलआयसी, बॅंकेत फिक्स डिपॉझिट, शेअर बाजार, रिअल इस्टेट असे अनेक पर्याय आहेत. असे अनेक पर्याय उपलब्ध असतांना सर्वात भरवशाचा पर्याय म्हणून टपाल खात्याच्या किसान विकास पत्र अर्थात केवीपी या योजनेकडे बघितले जाते. दामदुप्पट व सुरक्षित गुंतवणुकीमुळे अनेक जण या योजनेला पसंती देतात. 124 महिन्याच्या अवधीसाठी ही सुविधा उपलब्ध असते. विशेष म्हणजे, फक्त 30 महिन्याचा लॉकइन पीरियड यासाठी आहे. यामुळे 30 महिन्यानंतर खातेबंद करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

अवघ्या काही दिवसात करा पैसे दुप्पट, टपाल खात्याची केवीपी योजना
| Edited By: | Updated on: Jan 02, 2022 | 11:16 AM
Share

मुंबई : टपाल खात्याकडून अनेक योजना राबवण्यात येतात. यायोजनांमध्ये पैसे जमा करून चांगला परतावा मिळण्यासाठी मिळत असल्याने गुतवणुकीचा चांगला पर्याय उपलब्ध आहे. टपाल खात्याच्या योजनांमध्ये पैसे गुंतवणूक केल्याने पैसे आणि परताव्याची हमी मिळत असल्याने टपाल खात्याच्या योजना सुरक्षित मानल्या जातात. टपाल खात्याच्या काही योजनांमधून आयकरात सुट आणि पैसे दुप्पट करण्याची सोय असते. यामुळे अनेक गुंतवणूकदार टपाल खात्याच्या योजनेमध्ये सहभागी होण्यास पसंती देतात.

टपाल खात्याकडून अनेक लोकप्रिय योजना राबवण्यात येतात. यात मुदत योजना, मासिक बचत योजना, जेष्ट नागरिक बचत योजना, टपाल बचत खाते, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र या योजनांचा समावेश आहे. तसेच टपाल आवर्ती जमा खाते अर्थात आरडी आणि पीपीएफ या योजना देखील आहेत. यातील किसान विकास पत्र योजना आहे. यात गुंतवणूक केले पैसे दुप्पट करण्याची सोय आहे. किसान विकास पत्र या योजनेतून चांगला परतावा देण्यात येतो. यामुळे योजनांमध्ये गुंतवणूक करणार्यांची संख्या मोठी आहे. गुंतवणूक केल्यानंतर आयकरामध्ये देखील सवलत देण्यात येते. यामुळे गुंतवणुकीसोबतच कर बचतीसाठी देखील हा चांगला पर्याय आहे. देशातील प्रत्येक टपाल कार्यालयात किसान विकास पत्र काढण्याची सोय उपलब्ध आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर 6.9 टक्के व्याज देण्यात येते. योजनेत 1 हजार रुपयापासून गुंतवणूक करून शकता. अधिकतम कितीही गुंतवणूक या योजनेत करता येते.  जर तुम्ही 5 हजार रुपये गुंतवणूक केले तर 124 महिन्यानंतर तुम्हा 10 हजार रुपये मिळतील.

लॉकइन कालावधी कमी किसान विकास पत्र योजनेत 124 महिन्यात दाम दुप्पट पैसे मिळतात. मात्र योजनेत गुंतवणूक केल्यानंतर लॉकइनचा कालावधी कमी आहे. यामुळे अवघ्या 30 महिन्यात पैसे काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे 30 महिन्यानंतर पैसे काढून खाते बंद करता येउ शकते. काही कारणामुळे  पैशांची गरज असल्यास खाते बंद करून पैसे काढू शकता. खाते बंद करण्यासाठी फॉर्म 2 टपाल कार्यालयात भरून द्यावा लागेल. गुंतवणूक केल्यानंतर पैशाची गरज असल्यास योजनेचे प्रमाणपत्र कार्यालयात जमा करून पैसे काढता येउ शकतात.

जर तुम्ही 1 हजार रुपये किसान विकास पत्र तयार केले. मात्र तीन वर्षापूर्ण होण्यापूर्वीच तुम्ही पैसे काढले तर 1 हजार 154 रुपये मिळतील. जर पाच वर्षानतर खाते बंद केले तर 1हजार332 आणि  साडेसात वर्षानंतर मात्र आठ वर्षापूर्वी खाते बंद केले तर 1 हजार 37 रुपये मिळतील.तसेच दहा वर्षपूर्ण होण्यापूर्वीच खाते बंद केल्यास 1 हजार 774 रुपये देण्यात येतात. 124 महिन्याची मुदत पूर्ण झाल्यानंतर पैसे दुप्पट होउन तुम्हाला 2 हजार रुपये मिळतीत.

संबंधित बातम्या :

गुंतवणूक मंत्र: पीपीएफ सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह, वार्षिक 7.1% रिटर्न

डिजिटल करन्सीसाठी चालू वर्ष कसे राहणार?; जाणून घ्या क्रिप्टोमधील गुंतवणुकीबद्दल तज्ज्ञाचे मत

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.