AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोस्टमन घरी येऊन आधारकार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करणार; आता आधार केंद्रात जाण्याची गरज नाही

आधारकार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करणं आता आणखी सोप्पं झालं आहे. आधारकार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर आता आधार केंद्रात जाण्याची गरज नाही. (Now, get mobile number updated in Aadhaar at your doorstep, now how?)

पोस्टमन घरी येऊन आधारकार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करणार; आता आधार केंद्रात जाण्याची गरज नाही
मोबाईलद्वारेही बदलू शकता आधारमधील तुमचे नाव आणि जन्मतारीख
| Edited By: | Updated on: Jul 25, 2021 | 9:23 AM
Share

नवी दिल्ली: आधारकार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करणं आता आणखी सोप्पं झालं आहे. आधारकार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर आता आधार केंद्रात जाण्याची गरज नाही. आता पोस्टमनच तुमच्या घरी येईल आणि तुमचा नंबर अपडेट करून देणार आहे. संपूर्ण देशात ही सेवा लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे आधार केंद्रात जाऊन रांगा लावण्याची गरज पडणार नाही. (Now, get mobile number updated in Aadhaar at your doorstep, now how?)

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि यूआयडीएआयने याबाबतचा एक करार केला आहे. त्यानुसार आता पोस्टमन घरी येऊन आधारकार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करून देईल. देशातील 650 इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकच्या नेटवर्कमध्ये हे काम सुरू आहे. 1.46 लाख पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पोस्टमनला स्मार्ट फोन देणार

या कामासाठी पोस्ट खातं पोस्टमनला हायटेक स्मार्ट फोन देणार आहेत. यातील खास सॉफ्टवेअर अॅपच्या माध्यमातून आधारकार्ड नंबर अपडेट करून मिळणार आहे. त्यासाठी पोस्टमनना ट्रेनिंगही देण्यात आली आहे. हे प्रशिक्षित पोस्टमन आता घरोघरी जाऊन आधारकार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून देणार आहेत.

एनरॉलमेंट सुविधाही मिळणार

पोस्ट ऑफिसचे व्यापक नेटवर्क, पोस्टमन आणि जीडीसीच्या माध्यमातून यूआयडीएआयच्या मोबाईल अपडेट सुविधेच्या माध्यमातून ज्या ठिकाणी बँकिंग सेवा सुविधा नाही, तिथे बँकिंग सुविधाही देण्यात येणार आहे. तसेच आपीपीबी सध्या फक्त मोबाईल अपडेट सर्व्हिस देणार आहे. लवकर आपल्या नेटवर्कच्या माध्यमातून मुलांसाठी एनरॉलमेंट सर्व्हिस सुरू करणार आहे. असं आयपीपीबीचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ जे. व्यंकटरामू यांनी सांगितलं.

मोबाईल नंबर अपडेट असणं आवश्यक

आजच्या काळात प्रत्येक कामासाठी आधारकार्ड विचारलं जातं. सरकारी सेवांचा लाभ असो की साधं सीमकार्ड घेणं असो, प्रत्येक कामासाठी आधारकार्ड लागतंच. शिवाय इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठीही आधार कार्डची गरज असतेच. ईपीएफ अकाऊंटमधून पैसे काढण्यासाठीही आधारचीच गरज असते. या सेवांचा लाभ उठवताना मोबाईलवर ओटीपी नंबर येत असतो. ओटीपी नंबर आला तरच काम होतं. अन्यथा होत नाही. आधारला जर मोबाईल लिंक नसेल तर ओटीपी नंबर येत नाही. त्यामुळे आधार मोबाईलशी लिंक करणं आवश्यक आहे.

आतापर्यंत मोबाईल नंबर कसा अपडेट व्हायचा?

आतापर्यंत आधारमध्ये मोबाईल नंबर लिंक करायचा असेल तर तुम्हाला जवळच्या आधार केंद्रावर जावं लागायचं. तिथे गेल्यावर एक फॉर्म भरावा लागायचा. त्यासाठी 50 रुपये शुल्कही भरावे लागायचे. त्यानंतर हा नंबर अपडेट केला जायचा. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या कागदपत्राची आवश्यकता नाही. दरम्यान, यंदा 31 मार्चपर्यंत देशातील 128.99 कोटी लोकांना आधारकार्ड देण्यात आले आहेत. (Now, get mobile number updated in Aadhaar at your doorstep, now how?)

संबंधित बातम्या:

आधारकार्ड घरी विसरलात? आता स्मार्टफोनमध्येच ठेवा आधारकार्ड, कसे कराल डाऊनलोड

PF Account : कसा काढायचा पेन्शनमध्ये जमा झालेला हिस्सा? या अटी कराव्या लागतील पूर्ण

तुमच्याकडे एक रुपयांचं नाणं आहे का? मग तुम्हीही रातोरात होऊ शकता लखपती

(Now, get mobile number updated in Aadhaar at your doorstep, now how?)

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....