SBI बँकेत झीरो बॅलन्स खाते उघडणे झाले सोपे, ही सेवा मोफत मिळणार

SBI Bank | एसबीआयच्या BSBD खात्याअंतर्गत खातेधारकांना इतर बचत खात्यांपेक्षा अधिकच्या सुविधा मिळतील. या खात्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी किमान किंवा कमाल शिल्लक ठेवण्याची गरज नाही.

SBI बँकेत झीरो बॅलन्स खाते उघडणे झाले सोपे, ही सेवा मोफत मिळणार
एसबीआय बँक

मुंबई: भारतीय स्टेट बँकेने आता आपल्या ग्राहकांना आणखी एक नवी सुविधा देऊ केली आहे. या सुविधेमुळे आता ग्राहकांना बँकेत झीरो बॅलन्स खाते उघडणे आणखी सोपे झाले आहे. एसबीआय बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खाते (बीएसबीडीए) कोणत्याही व्यक्तीद्वारे वैध केवायसी देऊन उघडता येते. या बँक खात्यात आवश्यक किमान शिल्लक शून्य आहे आणि या खात्यात जास्तीत जास्त रकमेवर कोणतीही मर्यादा नाही.

एसबीआयच्या BSBD खात्याअंतर्गत खातेधारकांना इतर बचत खात्यांपेक्षा अधिकच्या सुविधा मिळतील. या खात्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी किमान किंवा कमाल शिल्लक ठेवण्याची गरज नाही. स्टेट बँकेच्या इतर बचत खात्यांवर उपलब्ध असलेले व्याज या खात्यावर दरवर्षी दिले जाते. हे खाते उघडण्यासाठी सर्वात महत्वाची अट म्हणजे ग्राहकाचे इतर कोणतेही बचत खाते नसावे, जर बचत किंवा मूलभूत बचत खाते असेल तर ग्राहकाला ते 4 आठवड्यांच्या आत बंद करावे लागेल.

नवीन नियमांनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून किंवा एटीएममधून बीएसबीडी खात्यातून पैसे काढल्यास महिन्याला चारवेळा (एटीएम आणि शाखेसह) मोफत पैसे काढता येतात. त्यानंतर, बँक शुल्काची आकारणी करेल. एसबीआय एटीएम व्यतिरिक्त, इतर बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी समान शुल्क लागू आहे.

मोफत चेकबुकची सुविधा

एसबीआय बीएसबीडी खातेधारकांना आर्थिक वर्षात पहिले 10 धनादेश मोफत देण्यात येतील. त्यानंतर 10 चेक असलेल्या चेकबुकसाठी 40 रुपये प्लस जीएसटी आकारला जाईल. 25 चेकसह चेकबुकसाठी 75 रुपये अधिक जीएसटी आकारला जाईल. 10 चेकसह आपत्कालीन चेक बुकसाठी 50 रुपये अधिक जीएसटी भरावा लागेल. ज्येष्ठ नागरिकांना चेकबुकवरील नवीन सेवा शुल्कापासून सूट देण्यात आली आहे.
BSBD खातेधारकांसाठी शाखा वाहिन्या/एटीएम/सीडीएमद्वारे गैर-आर्थिक व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. हे व्यवहार एसबीआय एटीएम किंवा इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून करता येतात. त्याचप्रमाणे, शाखा आणि पर्यायी माध्यमांद्वारे हस्तांतरण व्यवहारांवर बँक कोणतेही शुल्क आकारणार नाही.

डेबिट कार्डावरची रक्कम EMI मध्ये कन्व्हर्ट करा

अनेकदा शॉपिंगला गेल्यावर वस्तू खरेदी करण्याच्या नादात आपल्याला नेमक्या खर्चाचा अंदाज येत नाही. पण बिलिंग काऊंटरवर गेल्यानंतर आपण प्रमाणापेक्षा जास्त खर्च केला असे लक्षात येते. तुमच्याकडे डेबिट कार्ड असेल तर पैसे तात्काळ भरावे लागतात. परंतु, त्यामुळे पुढील खर्चाचा ताळमेळ बिघडण्याची भीती असते.

अशावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या डेबिट कार्डधारकांना खास सोय देऊ केली आहे. त्यानुसार ग्राहक डेबिट कार्डवरून पूर्ण पैसे खर्च न करता ती रक्कम EMI मध्ये कन्व्हर्ट करु शकता. ग्राहकपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा स्थानिक दुकानांमध्ये तुम्ही डेबिट कार्ड स्वाईप केल्यानंतर तुम्ही ईएमआय सुविधेचा लाभ घेऊ शकता. याशिवाय, Amazon किंवा फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स पोर्टलवरून खरेदी करतानाही तुम्हाला या विशेष सुविधेचा लाभ घेता येईल.

संबंधित बातम्या:

डेबिट कार्डावरची रक्कम EMI मध्ये कशी कन्व्हर्ट कराल?

SBI चं कोट्यवधी ग्राहकांना गिफ्ट; सर्व शुल्क रद्द, प्रत्येक महिन्याला अधिक लाभ मिळणार

रेशन कार्डवरील मोबाईल क्रमांक बदलायचाय, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI