AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pan Card : पॅनकार्ड झाले निष्क्रिय, तरीही करता येईल ही कामे

Pan Card : आधार कार्डशी पॅनची जोडणी न करणाऱ्यांवर मोठं संकट येऊन ठेपलं आहे. पॅनकार्ड निष्क्रिय झाल्याचा त्यांना मोठा फटका बसला आहे. तरीही काही अपवाद आहेत. ही कामे त्यांना अजूनही करता येणार आहेत, कोणता मिळाला दिलासा..

Pan Card : पॅनकार्ड झाले निष्क्रिय, तरीही करता येईल ही कामे
| Updated on: Jul 16, 2023 | 7:46 PM
Share

नवी दिल्ली | 16 जुलै 2023 : केंद्र सरकारने पॅन कार्ड आधार कार्डशी लिकं (Pan Card-Aadhaar Card Linking) करण्याची नागरिकांना अनेकदा संधी दिली. जवळपास सहा वर्षांपासून केंद्र सरकार सातत्याने आव्हान करत होते. तरीही काहींनी आधार कार्ड-पॅनकार्डशी जोडण्यास टाळाटाळ केली. अर्थात आता त्यांना या गोष्टीचा फटका बसणार आहे. कार्डच्या लिंकिंगसाठी आयकर खात्याने (Income Tax Department ) 1 जुलै 2017 रोजी नियम लागू केला होता. वेळोवेळी मुदत वाढ दिली होती. 30 जून 2023 रोजीपर्यंत कार्डची जोडणी करण्यासाठी अंतिम मुदत होती. ही मुदत संपल्याने अनेकांना आर्थिक व्यवहारच नाही तर बऱ्याच सेवांपासून वंचित राहावे लागणार आहे. पण तरीही काही अपवाद आहेत. ही कामे त्यांना अजूनही करता येणार आहेत, कोणती आहेत ही कामे..

दंडाची तरतूद

1 एप्रिल 2022 आणि जून 2022 या दरम्यान आधार लिंक केल्यावर 500 रुपये दंड लावण्यात आला. तर गेल्या वर्षी 1 जुलै 2022 पासून आधार-पॅन जोडणीसाठी 1,000 रुपये दंडाची तरतूद करण्यात आली. त्यानंतर ही अनेकांनी दोन्ही कार्डची जोडणी केली नाही.

पॅनकार्डचा यासाठी वापर

केंद्र सरकारने कर चोरी शोधण्यासाठी पॅनकार्ड सुरु केले. करदात्यांची गुंतवणूक, कर्ज आणि इतर व्यावसायिक घटनांचा रेकॉर्ड त्यामुळे सरकार दरबारी नोंदवल्या जातो. त्यासाठी पॅनकार्ड क्रमांकाचा उपयोग होतो. अनेक आर्थिक बाबींचा ट्रॅक रेकॉर्डसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. देशात विना पॅन कार्ड मोठा व्यवहार करता येत नाही.

पॅनकार्ड निष्क्रियतेचा फटका

पॅनकार्ड निष्क्रिय झाल्याचा फटका नागरिकांना बसेल. त्यांना पॅनकार्ड नसेल तर सरकारी, सहकारी आणि खासगी बँकेत खाते उघडता येणार नाही. क्रेडिट आणि डेबिट कार्ड मिळणार नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट खाते उघडता येणार नाही. कोणत्याही संस्थेला 50 हजार रुपयांची रक्कम पाठविता येणार नाही. आरबीआयकडून बाँड खरेदीसाठी एकदाच 50 हजारांहून अधिकची रक्कम खर्च करता येणार नाही. निष्क्रिय पॅन वापरल्यास कर कपातीचा फटका बसू शकतो.

या सुविधा मिळतील

  1. बँक एफडीवरील व्याज मिळेल
  2. एफडी-आरडीवरील वार्षिक 40 हजार रुपये व्याज घेण्यास पात्र
  3. ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक 50 हजार रुपयांपर्यंतचे व्याज घेता येईल
  4. आर्थिक वर्षात म्युच्युअल फंडातून 5 हजार रुपयांपेक्षा अधिक लाभांश घेता येईल
  5. 10 लाख रुपयांपेक्षा अधिक मूल्याची कार खरेदी करता येईल
  6. ईपीएफ खात्यातून 50,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढता येईल
  7. 50,000 रुपयांपेक्षा अधिकचे घर भाडे देता येईल

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.