युनियन आणि सेंट्रल बँकांची ग्राहकांसाठी खास योजना, 9 टक्‍क्‍यांपेक्षा कमी व्याजने व्यक्तिगत कर्ज 

युनियन आणि सेंट्रल बँकांची ग्राहकांसाठी खास योजना, 9 टक्‍क्‍यांपेक्षा कमी व्याजने व्यक्तिगत कर्ज 
डिजिटल कर्ज

इंडियन बँक 9.05 टक्क्यांनी पर्सनल लोन(Personal Loan) देत आहे. पाच लाखांच्या कर्जावर 10,391 रुपयांचा EMI  भरावा लागेल. बँक ऑफ महाराष्ट्र 9.45 टक्के व्याजाने व्यक्तिगत कर्ज देत आहे.  पाच लाखांच्या कर्जावर ग्राहकाला 10, 400 रुपयांचा मासिक हप्ता  भरावा लागेल

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Jan 03, 2022 | 9:41 AM

मुंबई : तात्काळ कर्ज हवे असेल तर आपल्याला सर्वात अगोदर आठवते ते व्यक्तीगत कर्ज (personal loan). अल्प प्रमाणातील व्यक्तिगत कर्ज यासाठी सोयीस्कर मानले जाते. अगदी निकडीच्या काळात घेण्यात येणारे व्यक्तिगत कर्ज कोणत्या बँकेत स्वस्त मिळते याची खातेदाराला माहिती असणे गरजेचे आहे. जवळपास सर्वच बँका व्यक्तिगत कर्ज देतात. काही बँकांचे व्याजदर कमी असते. तर काही बँका पर्सनल लोनवर जादा व्याज आकारतात. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी बँका आकारत असलेल्या व्याजाची माहिती करुन घेणं सोयीस्कर ठरते. ग्राहकाची क्रेडिट  हिस्ट्री आणि क्रेडिट स्कोअर यावरही व्याजदर कमी अधिक होऊ शकतं. ग्राहकाला स्वस्तात कर्ज मिळू शकते.

पगारदार व्यक्ती अथवा रोजंदार व्यक्ती या आर्थिक मिळकतीच्या प्रमाणावर ही  स्वस्त कर्ज उपलब्ध होण्याचे गणित अवलंबून असते. खातेधारकाला किती रुपयांचे कर्ज घ्यायचे आहे, यावर ही कर्जाचा मासिक हप्ता ठरतो. त्याआधारे कर्ज स्वस्त अथवा महाग ठरु शकते. सध्या व्याजाचा हप्ता बघता, युनियन बँक पर्सनल लोनवर सर्वात स्वस्त व्याज आकारते. तर त्यानंतर सेंट्रल बँक स्वस्त कर्ज देत आहे. पंजाब नॅशनल बँकेचा त्यानंतर स्वस्त कर्ज देणा-या बँकेच्या यादीत समावेश होतो. या बँका 5 वर्षांच्या कालावधीसाठी व्यक्तिगत कर्जावर 9 टक्क्यांपेक्षा कमी व्याजदर आकारत आहे.

युनियन बँकेचा व्याजदर सर्वात कमी
सर्वात कमी व्याजदर असणाऱ्या बँकांच्या यादी मध्ये युनियन बँकेचा क्रमांक सर्वात वर आहे.  युनियन बँक ग्राहकाला 8.90 टक्के व्याजदराने पर्सनल लोन देत आहे.  5 लाखांच्या कर्जावर तुम्हाला 10,355 रुपयांचा ईएमआय द्यावा लागेल.  त्यानंतर सेंट्रल बँक 8.90 टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करत आहे. 5 लाखांच्या कर्जावर 10,355 रुपयांचा ईएमआय द्यावा लागेल.  त्यानंतर पंजाब नॅशनल बँकेमध्ये व्यक्तिगत कर्जासाठी 8.90 टक्के व्याजदर आकारले जाणार आहे.  5 लाखांच्या व्यक्तिगत कर्जासाठी पाच वर्षांकरिता 10,355 रुपये मासिक हप्ता ग्राहकाला द्यावा लागेल.
इंडियन बँक 9.05 टक्क्यांनी व्यक्तिगत कर्ज देत आहे. 5 लाख रुपयांच्या कर्जावर 10,391 रुपयांचा ईएमआय द्यावा लागेल.  बँक ऑफ महाराष्ट्र 9.45 टक्के व्यक्तिगत कर्ज देत आहे. या  बँकेच्या 5 लाखांच्या कर्जावर 10,489 रुपयांचा मासिक हप्ता द्यावा लागेल. पंजाब आणि सिंध बँकेत व्यक्तिगत कर्जासाठी 9.50.टक्क्यांनी व्याज द्यावे लागेल. 5 लाखांच्या कर्जासाठी 10,500 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागेल. या सर्व बँकांचे कर्ज  आणि ईएमआय हे 5 वर्षांकरिता असेल.

असा आहे EMI चा हिशेब
आईडीबीआई बँकेचा व्याजदर 9.50 टक्के आहे. 5 लाख रुपयांच्या कर्जावर बँकेला 10501 रुपयांचा ईएमआय भरावा लागतो. तर स्टेट बँक ऑफ इंडिया सध्या व्यक्तिगत कर्जासाठी 9.7 टक्के व्याज आकारत आहे.  5लाख रुपयांच्या कर्जासाठी एसबीआय मध्ये 10, 525 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. बँक ऑफ बडोदा व्‍यक्तिगत कर्ज लोनवर 10 टक्के व्याज आकारते. 5 लाख रुपयांच्या कर्जासाठी  बँकेत 10, 624 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागेल. युको बँकचा व्याजदर 10.05 टक्के आहे.  5 लाखांच्या कर्जावर 10, 636 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागेल. कोटक बँक 10.25 टक्के दराने व्यक्तिगत कर्ज देत आहे.  5 लाख रुपयांच्या कर्जावर  10,625 रुपयांचा ईएमआय ग्राहकांना भरावा लागेल. बँक ऑफ इंडिया 10.35 टक्के दराने व्यक्तिगत कर्ज देत आहे.  5 लाख रुपयांच्या व्यक्तिगत कर्जावर ग्राहकाला 10710 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागेल.

संबंधित बातम्या :

गुंतवणूक मंत्र: पीपीएफ सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह, वार्षिक 7.1% रिटर्न

डिजिटल करन्सीसाठी चालू वर्ष कसे राहणार?; जाणून घ्या क्रिप्टोमधील गुंतवणुकीबद्दल तज्ज्ञाचे मत

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें