100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 16 October 2021

| Updated on: Oct 16, 2021 | 9:09 AM

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर भाजप असणार असल्याचं सांगितलं जात होतं. उद्धव ठाकरे यांनीही भाषणाला सुरुवात करताच थेट भाजपवर हल्ला चढवला. अगदी पहिल्या वाक्यापासून उद्धव ठाकरेंनी भाजपची पिसे काढली.

Follow us on

अजूनही मी मुख्यमंत्री आहे असंच मला वाटतंय असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात फडणवीसांच्या या विधानाची खिल्ली उडवली. मी मुख्यमंत्री आहे असं मला कधीच वाटू नये. कारण हल्ली काही लोकांना मुख्यमंत्री असल्यासारख वाटत आहे, असा चिमटा काढतानाच पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणतायत मी गेलोच नाही, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर भाजप असणार असल्याचं सांगितलं जात होतं. उद्धव ठाकरे यांनीही भाषणाला सुरुवात करताच थेट भाजपवर हल्ला चढवला. अगदी पहिल्या वाक्यापासून उद्धव ठाकरेंनी भाजपची पिसे काढली.

तुमचे आशीर्वाद घेत अशताना माझ्या मनात नेहमी नम्र भावना असते. प्रत्येक जन्मी हेच आई-वडील, माझा कुटुंब-परिवाह हाच मिळायला पाहिजे. आणि महाराष्ट्रात जन्म व्हायला पाहिजे. आणि मला स्वत:ला मी मुख्यमंत्री आहे, असं कधीच वाटू नये. माझं तर सोडाच तर माझ्या तमाम जनतेला मी मुख्यमंत्री आहे असं कधीच वाटता कामा नये. मी घरातलाच आहे, मी तुमचा भाऊ आहे, असं वाटो, अशी इच्छवर चरणी प्रार्थना आहे. कारण काही जणांना असं वाटतं जे बोलत होते पुन्हा येईल ते बोलत आहेत मी गेलोच नाही. बस आहे तिकडेच. पण जे संस्कार आणि संस्कृती असते ती हीच असते. पदं आणि सत्ता काय आहेत? पदं येतील जातील. पण कधीही अहमपणा कधी डोक्यात येऊ देऊ नको. ज्यादिवशी डोक्यात हवा जाईल, त्यादिवशी तू संपलास, अशी माझ्या वडील आणि आजोबांची शिकवण आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.