ऑनलाईन गेमच्या नादात स्वतःचा चिरला गळा, गुगलवर एकच शब्द सतत सर्च; तुमची मुलं तर हा गेम खेळत नाहीत ना?

ऑनलाईन गेमच्या नादात स्वतःचा चिरला गळा, गुगलवर एकच शब्द सतत सर्च; तुमची मुलं तर हा गेम खेळत नाहीत ना?

| Updated on: Jan 28, 2025 | 11:55 AM

'डेथ ऑर लाईफ' या नावाचा गेम खेळत असताना या मुलीने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मध्यरात्री स्विटी नावाच्या मुलीने स्वतःचा गळा चिरून आपलं जीवन संपवल्याचा प्रकार उघडकीस आलाय.

नागपूरमध्ये ऑनलाईन गेमच्या नादात १७ वर्षीय मुलीने स्वतःचे जीवन संपवले आहे. ऑनलाईन गेमचं व्यसन लागल्याने या मुलीनं आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. ‘डेथ ऑर लाईफ’ या नावाचा गेम खेळत असताना या मुलीने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मध्यरात्री स्विटी नावाच्या मुलीने स्वतःचा गळा चिरून आपलं जीवन संपवल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या घटनेनंतर नागपुरात एकच खळबळ उडाली आहे. तर धक्कादायक म्हणजे ही मृत मुलगी गुगलवर सतत डेथ हा शब्द सर्च करत होती. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील छत्रपती चौक परिसरात ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात अडकलेली मुलगी बारावीत शिकत होती. काल मध्यरात्री विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना ती तिच्या बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली आणि त्यांच्या पायाखालची जमीन हादरली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलगी एका नामांकित शाळेत शिकत होती. या मुलीला ऑनलाईन गेमिंगचे व्यसन लागले होते. तपासात असेही आढळून आले की ती वारंवार मृत्यू आणि परदेशी संस्कृतीशी संबंधित माहिती ऑनलाईन शोधत होती. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

Published on: Jan 28, 2025 11:55 AM