36 जिल्हे 72 बातम्या | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

36 जिल्हे 72 बातम्या | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

| Edited By: | Updated on: Aug 03, 2021 | 8:28 PM

राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे. सरकारकडून 11 हजार 500 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे.

36 जिल्हे 72 बातम्या |

1) राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे. सरकारकडून 11 हजार 500 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे.

2) प्रत्येक कुटुंबाला सानुग्रह दहा हजारांची मदत देण्यात येणार आहे. मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

3) पुरामध्ये दुकानाचे नुकसान झालेल्या दुकानदारांना 50 हजार तर टपरीधारकांसाठी 10 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.

4) पूर्ण घर पडलं असेल तर दीड लाखांची मदत दिली जाईल.

5) पूरग्रस्त भागात चार लाख एकर शेताचं नुकसान झालं आहे. त्यामुळे पंचनामे केल्यानंतर शेतकऱ्यांना मदत केली जाईल