4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 31 October 2021

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 31 October 2021

| Edited By: | Updated on: Oct 31, 2021 | 8:55 AM

परमबीर सिंग यांच्या विरोधात मुंबईसह ठाण्यात वसुलीप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आलेली आहे. मात्र, अजूनही त्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे ठाणे कोर्टानंतर आता मुंबईच्या किल्ला कोर्टाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे.

ठाणे कोर्टापाठोपाठ मुंबईच्या किल्ला कोर्टानेही मुंबईची माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या याचिकेवर सुनावणी करताना अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. परमबीर सिंग यांच्यासह विनय सिंग आणि रियाज भाटींविरोधातही अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

परमबीर सिंग यांच्या विरोधात मुंबईसह ठाण्यात वसुलीप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आलेली आहे. मात्र, अजूनही त्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे ठाणे कोर्टानंतर आता मुंबईच्या किल्ला कोर्टाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्यांच्यावर अॅट्ऱॉसिटी आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात तपासादरम्यान त्यांना वारंवार समन्स बजावूनही ते कुठे आहेत? याचा पत्ता राज्य सरकारला लागू शकलेला नाही. त्यामुळे आता परमबीर सिंह यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करणार नाही असा शब्द आम्ही देणार नाही, असं राज्य सरकारनं 20 ऑक्टोबर रोजी हायकोर्टात म्हटलं होतं. अॅट्रॉसिटी प्रकरणात दोन वेळा समन्स बजावण्यात आलं होतं त्याला सिंह यांनी उत्तर दिलं होतं, अशी माहिती सिंह यांचे वकील महेश जेठमलानी यांनी कोर्टात दिली आहे. मात्र, यापूर्वी परमवीर सिंह यांच्यावर कठोर कारवाई किंवा त्यांना अटक करणार नाही असं राज्य सराकरनं कोर्टात म्हटलं होतं. पण आजच्या सुनावणीवेळी हा शब्द आम्ही पुढे नेऊ शकणार नाही, कारण ते कुठे आहेत याचा पत्ता आम्हाला लागलेला नाही. ते कुठल्याही समन्सला उत्तर देत नाहीत, असं राज्य सरकारनं म्हटलं आहे.

Published on: Oct 31, 2021 08:55 AM