राहत्या घरात बिबट्या शिरला आणि… थरार कॅमेऱ्यात कैद
बिबट्याला पाहून थरकाप उडाला.
सातारा : राहत्या घरात बिबट्या शिरल्याची खळबळजनक घटना साताऱ्यात घडली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात कोयनानगर हेळवाक येथे राहणाऱ्या सुधीर कारंडे यांच्या राहत्या घरात बिबट्या शिरला. विलास कारंडे यांच्या घरातील सर्व सदस्य देवी विसर्जना साठी घर बाहेर गेले होते. घरी आल्यावर त्यांना घरात बिबट्या दिसला. बिबट्ला पाहून ते भयभित झाले. प्रसंगावधान दाखवून कारंडे यांनी घराचे दार बंद केले. वनविभागाची सर्व टीम वनक्षेत्रपाल घटनास्थळी दाखल झाले.
Published on: Oct 07, 2022 12:27 AM
