एकनाथ शिंदे आणि संजय राठोड यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला

| Updated on: Jun 26, 2022 | 4:41 PM

एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या बंडानंतर शिवसैनिकांमध्ये रोष व्यक्त होताना दिसत आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यामध्ये एकनाथ शिंदे आणि संजय राठोड यांचे प्रतीकात्मक पुतळे जाळल्याची घटना समोर आली आहे. उमरखेडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात संतप्त शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा निषेध केला. यावेळी त्यांनी शिंदे आणि राठोड यांच्याविरुद्ध नारेबाजी करीत त्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. एकनाथ […]

Follow us on

एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या बंडानंतर शिवसैनिकांमध्ये रोष व्यक्त होताना दिसत आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यामध्ये एकनाथ शिंदे आणि संजय राठोड यांचे प्रतीकात्मक पुतळे जाळल्याची घटना समोर आली आहे. उमरखेडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात संतप्त शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा निषेध केला. यावेळी त्यांनी शिंदे आणि राठोड यांच्याविरुद्ध नारेबाजी करीत त्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे समर्थक शिंदे यांच्या निर्णयाला समर्थन देत पोस्टरबाजी करीत आहेत, तर दुसरीकडे शिवसैनिक बंडखोर आमदारांच्या कार्यालयावर दगडफेक आणि पोस्टर जाळण्याचे प्रकार करीत आहेत. महाराष्टाच्या राजकारणात ही अद्वितीय घटना असल्याने याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.