Coldrif Syrup : 12 मुलांच्या मृत्यूला खरंच खोकल्याचं औषध कारण?, नेमका काय प्रकार? ‘त्या’ मुलांध्ये काय होती लक्षणं?
भेसळयुक्त कफ सिरपमुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये १२ बालकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. या घटनेनंतर केंद्र सरकारने दोन वर्षांखालील मुलांना कोणतेही कफ सिरप न देण्याचे निर्देश दिले आहेत. कोलड्रिप आणि नेक्सा डीएस या कफ सिरपवर काही राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली असून, अन्न-औषध प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
कफ सिरपमुळे मुलांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटना मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून समोर आल्या आहेत. मध्य प्रदेशात आतापर्यंत १५ बालकांचा मृत्यू झाला असून, राजस्थानमध्येही तीन बालकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी एका डॉक्टरला अटकही करण्यात आली आहे. या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त होत आहे.
भेसळयुक्त कफ सिरपमुळे १२ मुलांचा मूत्रपिंड निकामी होऊन मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. ‘कोलड्रिप’ आणि ‘नेक्सा डीएस’ या दोन औषधांवर तामिळनाडू, केरळ, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारने तातडीची बैठक बोलावून सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांना दोन वर्षांखालील मुलांना कोणतेही कफ सिरप न देण्याचे महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Published on: Oct 05, 2025 06:49 PM
