‘ठाण्यात घ्या थायलंडचा अनुभव’, मनसे कार्यकर्त्यांचं नाल्यात उतरून आंदोलन

| Updated on: Mar 27, 2023 | 5:15 PM

VIDEO | : ठाणे पालिकेनं कचरा उचलावा अन्यथा आयुक्तांच्या दालनासमोर कचरा टाकण्याचा मनसेने दिला इशारा

Follow us on

ठाणे : ठाणे शहर स्मार्ट सिटी बनत असताना दुसरीकडे मात्र ठाणे शहरातील नाल्यांमध्ये कचऱ्याचे साम्राज्य वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. याच्याच विरोधात आज मनसेच्या वतीने नाल्यात उतरून अनोखं आंदोलन करण्यात आले. ठाणे शहरातील नाल्यांमधे कचरा जमा होऊन थायलंड सारखे लँड, बेटं तयार झालेले आहे. याचे प्रशासनाला काहीही पडलेले नसून अर्थसंकल्पात फक्त घोषणा करण्याचे महापालिकेचे काम असून वारंवार याच्यावर दुर्लक्ष होत आहे. तर महापालिकेने हा कचरा लवकरात लवकर उचलावा अशी मागणी यावेळी मनसेचे स्वप्निल महेंद्रकर यांच्याकडून करण्यात आली आहे. हा कचरा पालिकेनं हटवला नाही तर अन्यथा हा कचरा पालिका आयुक्त यांच्या दालनासमोर टाकण्याचा इशाराही यावेळी मनसेकडून देण्यात आला आहे.