Manikrao Kokate : ते आले अन् थेट निघून गेले, कोकाटेंचा बोलण्यास नकार… मंत्रिमंडळ बैठकीत असं काय घडलं?

Manikrao Kokate : ते आले अन् थेट निघून गेले, कोकाटेंचा बोलण्यास नकार… मंत्रिमंडळ बैठकीत असं काय घडलं?

| Updated on: Jul 29, 2025 | 3:23 PM

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यानंतर अजित पवारांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. या नाराजीनंतर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला जाईल अशी चर्चा होती. मात्र अद्याप त्याचा राजीनामा घेतलेला नाही.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिल्याचे पाहायला मिळाले. मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर टीव्ही ९ मराठीच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. दरम्यान मंत्रिमंडळ बैठक होण्यापूर्वीही कोकाटेंशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे पाहायला मिळाले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर माणिकराव कोकाटे बाहेर पडले आणि आपल्या कारमध्ये जाऊन बसले. दरम्यान, काच लावून बसलेल्या कोकाटेंची प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न केला असताना त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाल्याचे नसल्याचे दिसून आले.

दरम्यान, आज कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांच्यात मुंबई मंत्रालयातील अजित पवारांच्या अँटी-चेंबरमध्ये भेट झाली. यावेळी अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले त्यानंतर पुन्हा त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली असताना कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Published on: Jul 29, 2025 03:23 PM