उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलंय; शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याचं टीकास्त्र

उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलंय; शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याचं टीकास्त्र

| Updated on: Mar 30, 2023 | 10:22 AM

Deepak Kesarkar : मंत्री दीपक केसरकर यांनी आज साईबाबांचं दर्शन घेतलं. त्यानंतर केसरकरांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. ते काय म्हणालेत? पाहा व्हीडिओ...

शिर्डी, अहमदनगर : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज साईबाबांचं दर्शन घेतलं.यानंतर दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. श्रीरामाच्या नावाने राजकारण करायचं परंतू हिंदूत्वापासून लांब जायचं. मालेगावात त्यांनी काय केलं हे सर्व जनतेनं बघितलंय. ते फक्त बोलतात , पण काही करत नाहीत. त्यांनी हिंदुत्व सोडलंय. बाळासाहेबांचे विचार सोडले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला उद्धवजींना बांधलंय, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत. संजय राऊत काहीही बोलतात. त्यांना हे सुचलंही नसेल की उत्तम सागवानी लाकड ही गडचिरोली आणि चंद्रपूरला आहेत. ते श्रीरामाच्या सेवेत गेली पाहिजेत, असंही केसरकर म्हणालेत.

Published on: Mar 30, 2023 10:18 AM