Vinayak Raut | गणेशचतुर्थीच्या आधी चिपी विमानतळावर विमान प्रवास सुरु होणार – विनायक राऊत

Vinayak Raut | गणेशचतुर्थीच्या आधी चिपी विमानतळावर विमान प्रवास सुरु होणार – विनायक राऊत

| Edited By: | Updated on: Jul 10, 2021 | 1:19 PM

चिपी विमानतळाचे काम 100 टक्के पूर्ण झाले असून, गणेश चतुर्थीच्या आधी विमान प्रवास सुरु होणार, असे विनायक राऊत म्हणाले आहेत.

चिपी विमानतळाचे काम 100 टक्के पूर्ण झाले असून, गणेश चतुर्थीच्या आधी विमान प्रवास सुरु होणार, असे विनायक राऊत म्हणाले आहेत. चिपी विमानतळाचे काम आम्ही पूर्ण केलं. भाजप खासदार नारायण राणेंच्या कारकिर्दीत चिपी विमानतळाचे काम केवळ 14 टक्के झालं होतं. मात्र आम्ही ते काम शंभर टक्के पूर्ण केले. त्यामुळे आता विमान वाहतूक सुरु करणार आहोत, अशी माहिती मध्यंतरी खासदार विनायक राऊतांनी दिली होती.सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळावरून गणेशचतुर्थीपूर्वी विमान प्रवास सुरु होणार आहे. काही महिन्यांपूर्वी डीजीसीए आणि एअरपोर्ट अथॉरिटीने ज्या दुरुस्त्या सुचवल्या होत्या, त्याचे तंतोतंत पालन करुन आता एअरपोर्ट वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. यासाठी जवळपास तीनशे ते साडेतीनशे कर्मचारी तसेच पंजाबवरुन मशिनरी आणि बाहेरून इतर टेक्नॉलजी मागवली होती. त्यांनी रनवेच्या पुर्नबांधणीचं काम व्यवस्थित केलं आहे. त्याचा रिपोर्ट आयआरबी कंपनीने डीजीसीएकडे पाठवला आहे, असे विनायक राऊत म्हणाले.