Jayant Patil Resign : जयंतराव आमच्याकडे या… प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देताच पाटलांना मोठ्या पक्षातून थेट ऑफर
कित्येकदा जयंत पाटील यांनी आपल्या राजीनाम्याचे संकेत दिले होते. मात्र आज त्यांनी आपला राजीनामा दिला. तर असे संकेत जयंत पाटील यांनी दिल्यानंतर भाजप किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटात ते प्रवेश करणार असल्याची चर्चाही झाल्या मात्र जयंत पाटलांनी या चर्चांचं खंडणही केलं होतं.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा आज राजीनामा दिला आहे. जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर आता प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ही शशिकांत शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते जयंत पाटील यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील हे राजकीयदृष्ट्या अस्वस्थ आहेत, असं बोललं जायचं, त्याच अस्वस्थपणामुळे जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा असल्याचे संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे. इतकंच नाहीतर संग्राम जगताप यांनी थेट जयंत पाटील यांना थेट ऑफर देत अजित पवार गटात आले तर आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांचं स्वागतच करतील, असं म्हटलंय.
Published on: Jul 12, 2025 04:23 PM
