Ajit Pawar NCP : कर्जतमधील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, पक्षाला पडलं खिंडार, राजकीय समीकरणं बदलणार!
कर्जतमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बॉबी वाघमारे आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कर्जत शहर उपाध्यक्ष नीरज गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे अजित पवार यांच्या गटाच्या राष्ट्रवादीला कर्जतमध्ये खिंडार पडले आहे.
राज्याच्या राजकारणात सध्या पक्षांतराची लाट सुरू असताना, कर्जत तालुक्यातून एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) कर्जतमध्ये मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन महत्त्वाचे युवा नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बॉबी वाघमारे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबतच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कर्जत शहर उपाध्यक्ष नीरज गायकवाड यांनीही शिवसेनेत प्रवेश करत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. या दोन्ही नेत्यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला कर्जत तालुक्यात मोठा झटका बसला असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि राज्याच्या राजकारणावर याचे परिणाम दिसून येऊ शकतात. या पक्षप्रवेशांनी कर्जतमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
