NCP Ajit Pawar : अजित दादांच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षानं काढली महिलेची छेड, गुन्हा दाखल; नेमकं घडलं काय?

NCP Ajit Pawar : अजित दादांच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षानं काढली महिलेची छेड, गुन्हा दाखल; नेमकं घडलं काय?

| Updated on: May 24, 2025 | 11:49 AM

गेल्या काही दिवसांपूर्वी ज्यावेळी आरोपींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शैलेश पवार यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून घेतली होती. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु असताना त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पुण्यातील इंदापूर शहरातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची मोठी माहिती समोर येत आहे. गोळीबार आणि महिलेची छेड काढल्याप्रकरणी इंदापुरातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शैलेश पवार यांच्यावर हा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. तर महिलेची छेड काढल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शैलेश पवार याला जाब विचारण्यासाठी महिला केली होती. दरम्यान, जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या पतीवर गोळीबार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार संबंधित महिलेने पुणे इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

तर गेल्या काही दिवसांपूर्वी शैलेश पवार यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. राजकीय आणि वैयक्तिक शत्रुत्वातून हा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता त्यावेळी वर्तविली जात होती. दरम्यान, आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती.

Published on: May 24, 2025 11:49 AM