Ajit Pawar | दूध का दूध, पानी का पानी होईल, उगाच ढगात गोळ्या मारु नका : अजित पवार

Ajit Pawar | दूध का दूध, पानी का पानी होईल, उगाच ढगात गोळ्या मारु नका : अजित पवार

| Edited By: | Updated on: Oct 08, 2021 | 11:09 AM

"मी सांगितलेलं आहे, सारखं सारखं मी सांगायची गरज नाही.  एकदा ती प्रक्रिया पूर्ण होऊ द्या. ढगात गोळ्या मारू नका. जे असेल ते दूध का दूध पाणी का पाणी पुढे येईल" अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने काल छापा टाकला होता. विशेष म्हणजे कालपासून आयकर विभागाच्या रडारवर अजित पवार आहेत. पार्थ पवार यांच्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयावर छापेमारी झाली, त्याआधी आयकर विभागाने अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावरही छापा टाकला होता. यापैकी एक बहीण कोल्हापूर तर इतर दोन बहिणी पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यानंतर आता पार्थ पवारांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने छापा टाकला.

“मी सांगितलेलं आहे, सारखं सारखं मी सांगायची गरज नाही.  एकदा ती प्रक्रिया पूर्ण होऊ द्या. ढगात गोळ्या मारू नका. जे असेल ते दूध का दूध पाणी का पाणी पुढे येईल” अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.