प्रत्येक मेसेजला उत्तर देणारे दादा… अजित पवारांचा शेवटचा फोन कॉल आला समोर
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे, प्रशासनावरील मजबूत पकड आणि अविरत कामाचा झपाटा असलेल्या अजित दादांचा आवाज आता कुठेच ऐकू येत नसून कायमचा शांत झाला आहे. मात्र त्यांच्या निधनापूर्वीचा शेवटचा फोन कॉल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे, प्रशासनावरील मजबूत पकड आणि अविरत कामाचा झपाटा असलेल्या अजित दादांचा आवाज आता कुठेच ऐकू येत नसून कायमचा शांत झाला आहे. मात्र त्यांच्या निधनापूर्वीचा शेवटचा फोन कॉल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात अजित दादांची शेवटची ऑडिओ क्लिप कार्यकर्त्यांना ऐकवण्यात आली असून, ती ऐकताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आले. काटेवाडी येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्रीजीत पवार यांनी अजित दादांशी झालेल्या शेवटच्या संवादाबद्दल माध्यमांशी बोलताना सांगितलं की, सकाळी 8 वाजून 19 मिनिटांनी त्यांनी एका कामासंदर्भात दादांना मेसेज केला होता. विमान हवेत असल्याने लगेच उत्तर मिळाले नाही. मात्र लँडिंगपूर्वी रेंज मिळताच अजित पवार यांनी 8 वाजून 37 मिनिटांनी श्रीजीत यांना स्वतः फोन केला. सुमारे एक मिनिट झालेल्या या संवादात अजित पवारांच्या आवाजात नेहमीचीच कामाची तळमळ आणि आपुलकी दिसून आली. प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेसेजला उत्तर देण्याची त्यांची सवय होती, असे श्रीजीत यांनी सांगितले. दादांचा शेवटचा आवाज सर्वांना ऐकता यावा म्हणून ही क्लिप ऐकवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. शेवटच्या श्वासापर्यंत कामाशी निष्ठा आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती या संवादातून दिसून आली आहे.
