Alia Bhatt : आलिया भट्टला पीएनंच घातला गंड्डा, 73 लाखांना लावला चुना, नेमंक प्रकरण काय?

Alia Bhatt : आलिया भट्टला पीएनंच घातला गंड्डा, 73 लाखांना लावला चुना, नेमंक प्रकरण काय?

| Updated on: Jul 09, 2025 | 4:36 PM

आलिया भट्टच्या पीएकडून करण्यात आलेल्या फसवणुकीच्या प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि आलिय भट्टच्या पीएला अटक केली. 

बॉलिवूड विश्वातील अभिनेत्री आलिया भट्टला तिच्या पीएनेच गंड्डा घातल्याची बातमी समोर येत आहे. आलिया भट्टची फसवणूक केल्याप्रकरणी आलिया भट्टच्या पीएला मुंबईतील जुहू पोलिसांक़डून अटक करण्यात आली आहे. आलिया भट्टच्या आईच्या तक्रारीवरून पीए वेदिका शेट्टीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पीए वेदिका शेट्टीने आलिया भट्टची तब्बल ७३ लाख ९० हजारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आलिया भट्टच्या पीएने तिला सुमारे ७३ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. ही रक्कम गहाण टाकून तिने आलियाच्या प्रोडक्शन कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान केले.

आलिया भट्ट ही एकमेव अशी व्यक्ती नाही जिची तिच्या जवळच्या किंवा विश्वासू लोकांकडून फसवणूक झाली आहे. यापूर्वी सुष्मिता सेनलाही तिच्या मॅनेजरने फसवले होते. श्रद्धा कपूरला एका इव्हेंट कंपनीने पेमेंटबाबत फसवले होते. दुसरीकडे, राजकुमार रावची पत्नी पत्रलेखा हिच्या नावाने बनावट ईमेल तयार करून कोणीतरी पैसे उकळण्याचा प्रयत्न केला होता.

Published on: Jul 09, 2025 04:26 PM