Ambernath : पहाटेच्या अंधाराचा फायदा, खिडकीतून आत शिरला अन्… एक वर्षाच्या चिमुकलीच्या अपहरणाचा असा झाला प्रयत्न
अंबरनाथच्या शास्त्रीनगर परिसरात पहाटे घरात शिरून एका वर्षाच्या चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला. रिक्षाचालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि स्थानिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
अंबरनाथच्या शास्त्रीनगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे पहाटेच्या सुमारास एका वर्षाच्या चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला. आरोपीने खिडकीतून घरात प्रवेश करून बालिकेला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या आईला जाग आल्याने त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर एका रिक्षाचालकाच्या प्रसंगावधानामुळे हा अपहरणाचा प्रकार उघडकीस आला. स्थानिकांनी तातडीने धाव घेत आरोपीला चांगला चोप दिला आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे शास्त्रीनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on: Nov 22, 2025 12:48 PM
