मनसेकडून नवी मुंबईत महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
नवी मुंबईत चार महिन्यांपासून रखडलेल्या महाराजांच्या पुतळ्याचे मनसेने अनावरण केले. अमित ठाकरे यांनी सरकारी अनास्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, की अनेक नेते नवी मुंबईत येऊनही महाराजांच्या पुतळ्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही, ही दुर्देवी बाब आहे. माझी पहिली केस महाराजांसाठी असेल तर मला आनंद आहे, असे त्यांनी नमूद केले.
नवी मुंबईत चार महिन्यांपासून रखडलेल्या महाराजांच्या पुतळ्याचे अखेर मनसे कार्यकर्त्यांनी अनावरण केले. मनसे नेते अमित ठाकरे यांनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ते कोपरखैरणे येथे शाखा उद्घाटनासाठी आले असताना, त्यांना महाराजांचा पुतळा अजूनही धूळखात आणि कपड्याने झाकलेला असल्याची माहिती मिळाली. ही बाब त्यांना बघवली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
अमित ठाकरे यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, गेल्या चार महिन्यांत अनेक मोठे नेते, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणि अगदी पंतप्रधानही नवी मुंबईत विविध कार्यक्रमांसाठी येऊन गेले. एअरपोर्टचे उद्घाटन, दहीहंडी, पक्षप्रवेश यांसारख्या कार्यक्रमांना त्यांना वेळ मिळाला, परंतु ज्यांना आपण दैवत मानतो, त्या महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी त्यांना वेळ मिळाला नाही, ही अत्यंत दुर्देवी गोष्ट आहे. त्यांनी निर्धार व्यक्त केला की, “माझी पहिली राजकीय केस किंवा जे काही, ती महाराजांसाठी असेल तर मला खूप आनंद होईल.” महाराष्ट्र सैनिकांनी हा पुतळा दर्शनासाठी खुला केल्याचे त्यांनी सांगितले.
