Amravati | वंचितला पाठिंबा द्यायचा की नाही? काँग्रेसच्या भूमिकेविषयी सर्वात मोठी माहिती; अमरावतीत नेमकं काय घडतंय?
अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की नाही, याबाबत काँग्रेसकडून अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नसल्याची माहिती समोर आली आहे.

यासंदर्भात काँग्रेस नेते सुनील देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना, “वंचितला पाठिंबा देण्याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही,” असे स्पष्ट केले. त्यामुळे काँग्रेसची भूमिका नेमकी काय असणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला काँग्रेसकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता सध्या कमी मानली जात आहे. याबाबत पक्षांतर्गत चर्चांना वेग आला असून, काँग्रेस नेत्यांची गटनेत्यांसोबत पुन्हा एकदा संध्याकाळी बैठक होणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, वंचितच्या उमेदवाराकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी बैठकीत पक्षाची भूमिका निश्चित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस कोणता निर्णय घेते आणि वंचितला पाठिंबा देते की स्वतंत्र भूमिका घेते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.