Navneet Rana : नवनीत राणा यांची शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर तिखट शब्दांत टीका

Navneet Rana : नवनीत राणा यांची शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर तिखट शब्दांत टीका

| Edited By: | Updated on: May 08, 2022 | 12:37 PM

मुंबई सत्र न्यायालयानं सशर्त जामीन दिला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी तिखट शब्दांत शिवसेनेवर टीका केली. 

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. सातत्यानं येऊन पत्रकार परिषद घेणाऱ्या संजय राऊतांवर नवनीर राणा यांनी टोला लगावला आहे. संजय राऊत यांचा उल्लेख पोपट असा करत त्यांनी निशाणा साधलाय. यावेळी नवनीत राणा यांनी संजय राऊत यांच्यासह शिवसेनेवर जोरदार शब्दांत टीका केली. खार पोलिसांना नवनीत राणा यांना अटक केल्यानंतर त्यांना बारा दिवस कोठडीत घालवावे लागले होते. त्यानंतर त्यांना अखेर मुंबई सत्र न्यायालयानं सशर्त जामीन दिला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी तिखट शब्दांत शिवसेनेवर टीका केली.

Published on: May 08, 2022 12:36 PM