दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता… बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
नागपूर येथे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक सामाजिक आणि राजकीय विषयांवर भाष्य केले. शेतकरी, खतटंचाई आणि राजकीय घडामोडींवर भाष्य केले. येत्या 8 ते 10 दिवसांत शेतकऱ्यांच्या पेरणीला सुरुवात होणार असून मोठ्या प्रमाणात युरिया आणि मिश्र खतांची गरज भासणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूर येथे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक सामाजिक आणि राजकीय विषयांवर भाष्य केले. शेतकरी, खतटंचाई आणि राजकीय घडामोडींवर भाष्य केले. येत्या 8 ते 10 दिवसांत शेतकऱ्यांच्या पेरणीला सुरुवात होणार असून मोठ्या प्रमाणात युरिया आणि मिश्र खतांची गरज भासणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र सध्या अनेक भागांत शेतकऱ्यांना पुरेसं खत उपलब्ध होत नसल्याची तक्रार त्यांनी केली. राज्य शासनाने तातडीने पावले उचलून खतांचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 90 रुपयांची वाढ झाल्याने सामान्य नागरिक अडचणीत आल्याचे देशमुख म्हणाले. डिझेल, पेट्रोल आणि गॅसच्या किंमती कमी करण्यासाठी राज्य सरकारने योग्य निर्णय घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
राजकीय घडामोडींवर बोलताना अनेक संस्थांमध्ये अध्यक्ष शरद पवार आहेत, तर दिलीप वळसे पाटील सदस्य आहेत. संस्थांच्या कामानिमित्त दोघांच्या भेटी होत असतात, त्यात काहीही वावगं नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याची कोणतीही शक्यता नसल्याचेही त्यांनी सांगितले.
