Anjali Damania | ….होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?

| Updated on: May 16, 2026 | 12:21 PM

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत घडामोडींना वेग आला असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा खासदार पार्थ पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पार्थ पवार यांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. ते स्वतःची वेगळी गँग घेऊन फिरत आहेत,” असा आरोप दमानिया यांनी केला. “अजित पवारांनंतर आपणच पक्षाचे सर्वेसर्वा आहोत, अशी भावना पार्थ पवार यांच्या वागण्यात दिसते,” असेही त्यांनी म्हटले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना अंजली दमानिया म्हणाल्या की, “सध्या पार्थ पवार यांना आपणच राष्ट्रवादी काँग्रेसचे केंद्रबिंदू आहोत असे वाटत आहे. ते स्वतःच्या मर्जीने निर्णय घेत आहेत आणि पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनाही डावलले जात आहे.” त्यांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्या नावांचाही उल्लेख करत पक्षातील अंतर्गत नाराजी वाढत असल्याचा दावा केला. “पार्थ पवार पक्षाचे राष्ट्रीय गणित पाहत असल्याने पक्षात धूसफूस वाढताना दिसत आहे,” असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, सरन्यायाधीशांनी केलेल्या “झुरळ” या उल्लेखावरही अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली. “मला झुरळ म्हटल्याचा धक्का बसला, पण जर सरन्यायाधीश तसे म्हणत असतील तर मला त्याचा अभिमान आहे,” असे त्या म्हणाल्या. तसेच, “सत्ताधारी विचित्र पद्धतीने वागत आहेत. हे सर्व संविधानाच्या विरोधात असून संबंधितांनी माफी मागितली पाहिजे,” अशी मागणीही त्यांनी केली.

Published on: May 16, 2026 12:21 PM
Follow Us